कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:18 IST2021-04-13T04:18:35+5:302021-04-13T04:18:35+5:30
तालुक्यातील लातूर रोड येथील जिल्हा परिषद शाळेत सोमवारी कोविड लसीकरणास सुरुवात करण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच ...

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे
तालुक्यातील लातूर रोड येथील जिल्हा परिषद शाळेत सोमवारी कोविड लसीकरणास सुरुवात करण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच वसुंधरा मुंडे होत्या. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय सावंत, डॉ. प्रदीप नाईकनवरे, डॉ. सोनवणे, माजी सरपंच मधुकरराव मुंडे, उपसरपंच अब्दुल शेख, सदस्य रणजित मिरकले, सदस्या मैनाबाई भदडे आदी उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार बिडवे म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. मास्कचा नियमित वापर करावा. फिजिकल डिस्टन्स पाळावा. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना पंडगे यांनी लसीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. आरोग्य विभागाचे लक्ष्मी कांबळे, शोभा स्वामी, विनोद चव्हाण, राजकुमार लिंबुटे, मनोज जाधव, गणेश पवार, ग्रामसेवक सुनील शिंगे, शंकर साबणे, सुगंधा वंगलवाड, अर्चना कराड, शांताबाई नागरगोजे, मुक्ताबाई मिरकले यांनी परिश्रम घेतले. यावेळी २१७ जणांना लसीकरण करण्यात आले. कार्यक्रमास राजेश्वर डुमणे, राजकुमार दराडे, श्रीराम वाघमारे, बाबूराव कलाल आदी उपस्थित होते.