कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी नागरिकांनी दक्ष राहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:20 IST2021-05-20T04:20:25+5:302021-05-20T04:20:25+5:30
उदगीरातील श्री नवयुवक व्यापारी गणेश मंडळ, संघर्ष मित्र मंडळ, रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल या सामाजिक संस्थांच्या वतीने गृहविलगीकरणातील ...

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी नागरिकांनी दक्ष राहावे
उदगीरातील श्री नवयुवक व्यापारी गणेश मंडळ, संघर्ष मित्र मंडळ, रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल या सामाजिक संस्थांच्या वतीने गृहविलगीकरणातील कोरोना बाधित रुग्णांसाठी ऑक्सिजन मशीनची सोय करण्यात आली आहे. या मशीनचे लोकार्पण शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात सोमवारी झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी लाईफ केअर हॉस्पिटलच्या अध्यक्षा डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, पंचायत समितीचे सभापती प्रा. शिवाजी मुळे, उद्योजक रमेश अंबरखाने, तहसीलदार रामेश्वर गोरे, अरविंद पाटील एकंबेकर, समीर शेख, रोटरीच्या सचिव किर्ती कांबळे, सागर महाजन, श्री नवयुवक व्यापारी गणेश मंडळाचे अध्यक्ष रामदास जळकोटे, संघर्ष मित्र मंडळाचे प्रशांत मांगुळकर, नारायण वाकुडे यांची उपस्थिती होती.
यावेळी महानंदा सोनटक्के, मनोज खत्री, सुभाष वाकुडे, संतोष पाटील, गोपाळ पाटील, संतोष फुलारी, बबलू जाधव, अनिरुद्ध गुरडे, अभिजित पत्तेवार, दत्ता वाकुडे, राहुल धनाश्री, सतीश पाटील, विजय मांगुळकर, ॲड. मंगेश साबणे, उदय धुर्वे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक विशाल जैन यांनी केले. सूत्रसंचालन नरसिंग कंदले यांनी केले. आभार मोतीलाल डोईजोडे यांनी मानले.