लसीकरणासाठी नागरिकांची खेडेगावाकडे धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:18 IST2021-05-22T04:18:40+5:302021-05-22T04:18:40+5:30
तालुक्यात ग्रामीण रुग्णालय, पाच प्राथमिक आरोग्य केंद्र व २५ आरोग्य उपकेंद्र असून, त्यातून लसीकरण मोहीम राबविली जात आहे. काही ...

लसीकरणासाठी नागरिकांची खेडेगावाकडे धाव
तालुक्यात ग्रामीण रुग्णालय, पाच प्राथमिक आरोग्य केंद्र व २५ आरोग्य उपकेंद्र असून, त्यातून लसीकरण मोहीम राबविली जात आहे. काही दिवसांपासून कोविड लसीचा पुरवठा न झाल्याने काही दिवस लसीकरण ठप्प झाले होते. दरम्यान, पुरवठा झाल्यानंतर काही नागरिक पहिल्या तर काहीजण दुसऱ्या डोससाठी आरोग्य केंद्रावर जात आहेत. त्यामुळे गर्दी होत आहे. दरम्यान, शहरातील काहीजण खेडेगावात लसीकरणासाठी जात आहे. अशा परिस्थितीत स्थानिक व प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दररोज लसीकरणाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे.
दरम्यान, शहरातील नागरिकांमुळे ग्रामीण भागात काही ठिकाणी वाद होत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने स्थानिकाला प्रथम प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानंतर शिल्लक राहिल्यास बाहेरील व्यक्तींना लस देण्यात येत आहे. ज्यांचा लसीकरणाचा कालावधी पूर्ण झाला आहे, ते धडपड करीत आहेत.
लसीचा अनियमित पुरवठा...
जिल्हास्तरावरून कोविड लसींचा पुरवठा केला जातो. मात्र सध्या पुरवठा मर्यादित असल्यामुळे व तो केव्हा उपलब्ध होईल, हे निश्चित नसल्याने अडचणी येत आहेत. काही दिवसांत पुरवठा झाल्यानंतर सर्वांना लसीकरण होणार आहे, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील दासरे यांनी सांगितले.