पोलिसांच्या वाहनाला नागरिकांचा ‘दे धक्का’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:17 IST2021-04-05T04:17:56+5:302021-04-05T04:17:56+5:30

अमदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण ७६ गाव आहेत. हद्दीतील जवळपास दोन लाख नागरिकांच्या सुरक्षेचा भार अवघ्या ५५ पोलीस अधिकारी, ...

Citizens 'push' on police vehicle | पोलिसांच्या वाहनाला नागरिकांचा ‘दे धक्का’

पोलिसांच्या वाहनाला नागरिकांचा ‘दे धक्का’

अमदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण ७६ गाव आहेत. हद्दीतील जवळपास दोन लाख नागरिकांच्या सुरक्षेचा भार अवघ्या ५५ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. सदरची संख्या अल्प आहे. पाेलीस ठाण्याच्या हद्दीत ७ बीट आहेत. त्यामध्ये अहमदपूर, हाडोळती, शिरूर ताजबंद, रोकडा सावरगाव, मोघा, शेंडगे, काळेगाव यांचा समावेश आहे. त्याचबराेबर पोलीस ठाण्याची हद्द २२ किलोमीटर परिसरात पसरलेली आहे. मात्र, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रवास आणि गस्तीसाठी देण्यात आलेली दोन्ही वाहने नादुरुस्त असून, गत चार वर्षापासून सदरचे वाहन दुरुस्त करून चालविले जात आहे. लॉकडाऊनच्या काळात गुन्हेगारांना पाठलाग करत असताना, सदरचे वाहन अचानक वाटेतच बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत. परिणामी, पोलिसांना रिकाम्या हाताने परतण्याची नामुष्की सहन करावी लागली आहे. गत महिन्यात चाकूर येथे एटीएम फोडल्यानंतर वायरलेसद्वारे अहमदपूर पोलीस ठाण्याला आरोपींचा पाठलाग करण्याबाबत संदेश आला हाेता. मात्र सांगवी पुलाजवळ जातच पोलीस वाहन बंद पडल्याने सदर चोरट्यांचा पाठलाग करता आला नाही. त्याचबराेबर परवा हाडोळती परिसरातील एका गुन्ह्यातील आरोपी अटक करण्यासाठी पोलीस व्हॅन जाताना रस्त्यातच बंद पडली. नागरिक आणि पोलिसांनी बराच वेळ धक्का मारला मात्र सुरू झाले नाही. शेवटी बंद पडलेले व्हॅन रस्त्यालगत साेडून एका खासगी वाहनाने अहमदपूर पाेलीस ठाणे गाठावे लागले. त्यानंतर दोन दिवसांनी टोचन करून सदर वाहन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. अनेकदा वाहन बंद पडल्याने, आरोपींनी धूम ठाेकली आहे. अहमदपूर शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असताना गस्तीसाठी चार वाहनांची गरज असताना एक वाहन बंद आहे. तर एकच वाहन सुरू असते.

लवकरच वाहन उपलब्ध हाेतील...

अहमदपूर पाेलीस ठाण्याची पाहणी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पाेलीस महानिरीक्षक निसार तांबाेळी, जिल्हा पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी काही दिवसांपूर्वी केली आहे. दरम्यान, येथील परिस्थितीचा, वाहनांची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली असता, ते म्हणाले, अहमदपूर पाेलीस ठाण्यांसाठी लवकरच वाहन उपलब्ध करून देण्यात येइल, असे सूत्रांनी सांगितले.

दामिनी पथकासाठी विशेष वाहन...

अहमदपूर शैक्षणिक शहर आहे. या शहरात शिक्षणानिमित्त राज्यातील कानाकाेपऱ्यातून माेठ्या प्रमाणावर विद्यार्थी येतात. मुलींच्या संरक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेले दामिनी पथक कार्यरत आहे. गत तीन वर्षांपासून वाहन बंद असल्याने, पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहेत. याबाबतही विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांच्याशी चर्चा करण्यात आली असून, दामिनी पथकासाठी स्वतंत्र वाहन देण्यात येणार आहे. यातून विद्यार्थ्यांचे सरंक्षण करणे साेयीचे ठरणार आहे. त्याचबराेबर अमदपूर शहरात गस्तही वाढतविता येणार आहे.

Web Title: Citizens 'push' on police vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.