चेरा येथे सतत वीज गुल होत आहे. परिणामी, गावातील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. सध्या कोरोनाच्या संकटामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. परंतु, मोबाईल चार्जिंगसाठी अखंडित वीजपुरवठा होत नसल्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणास ब्रेक लागत आहे. महिनाभरापासून विजेची समस्या जाणवत आहे. त्यामुळे नागरिक वैतागले आहेत.
दरम्यान, या भागात विविध कंपन्याचे मोबाईल टॉवर आहेत. मात्र, सदरील कंपन्यांच्या दुर्लक्षामुळे सतत मोबाईलची रेंज गुल होत आहे. त्यामुळे तात्काळ संवाद साधण्यासाठी अडचणी येत आहेत. विजेबरोबरच मोबाईल सेवा विस्कळीत होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. महावितरण आणि खाजगी मोबाईल कंपन्यांनी याकडे लक्ष देऊन सेवा सुरळीत द्यावी, अशी मागणी होत आहे.