दवाखान्यातून मुलाला पळविले !
By Admin | Updated: October 27, 2014 00:10 IST2014-10-26T23:57:51+5:302014-10-27T00:10:24+5:30
लातूर : लातूर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सहा वर्षीय मुलाला पळवून नेल्याची घटना २३ आॅक्टोबर रोजी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

दवाखान्यातून मुलाला पळविले !
लातूर : लातूर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सहा वर्षीय मुलाला पळवून नेल्याची घटना २३ आॅक्टोबर रोजी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून जगदीश नामक व्यक्तीविरुद्ध शिवाजी नगर पोलिसात शनिवारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
लातूर शहरातील एका खाजगी रुग्णालयात मेनका दत्तात्रय परशुराम यांच्या सहा वर्षीय पार्थ या मुलास उपचारासाठी २१ आॅक्टोबर रोजी दाखल करण्यात आले होते. २३ आॅक्टोबर रोजी ७.३० वाजण्याच्या सुमारास मेनका दत्तात्रय परशुराम यांच्या पतीच्या कार्यालयातील जगदीश नावाचे ग्रहस्थ आले. पार्थ याला फिरवून आणतो म्हणून बाहेर नेले. मात्र त्याला परत दवाखान्यात आणले नाही, असे शिवाजी नगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत मेनका परशुराम यांनी म्हटले आहे. त्यानुसार जगदीश नामक व्यक्तीविरुद्ध कलम ३६३ भादंविनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एस.आर. सोनवणे करीत आहेत.
दरम्यान, तपासिक अधिकारी एस.आर. सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, फिर्यादीच्या पतीच्या कार्यालयातील जगदीश नावाच्या व्यक्तीने मुलाला नेले आहे. बहुदा त्यांचे घरगुती भांडण आहे. मात्र जगदीश याने मुलाला आईच्या परवानगीविना दवाखान्यातून नेले आहे. त्यामुळे हा गुन्हा नोंद आहे. किडनॅपिंगचा प्रकार नसल्याचे सोनवणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)