छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकशाही मुल्यांचे बीजारोपण केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:29 IST2021-02-23T04:29:47+5:302021-02-23T04:29:47+5:30
येथील शिवाजी महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव होते. यावेळी डॉ. गव्हाणे म्हणाले, ...

छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकशाही मुल्यांचे बीजारोपण केले
येथील शिवाजी महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव होते. यावेळी डॉ. गव्हाणे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्यायी व अत्याचारी राजवटीतून बहुजन समाजाला मुक्त करण्यासाठी अठरापगड जातींच्या लोकांना एका झेंड्याखाली एकत्र आणून रयतेचे कल्याणकारी राज्य निर्माण केले. गनिमी कावा व बुद्धी कौशल्याचा वापर करून शत्रूंच्या चारीमुंड्या चित केल्या. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी राजे यांचा इतिहास हा पारतंत्र्याच्या खाईतून सामान्य माणसाला मुक्त करणारा आहे. प्रास्ताविक डाॅ. ए. एम. नवले यांनी केले. ग्रंथपाल प्रा. विष्णू पवार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. आभार उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. जगताप यांनी मानले. यावेळी उपप्राचार्य डॉ. आर. एम. मांजरे, डॉ. एस. डी सावंत, डॉ. व्ही. के. भालेराव आदी उपस्थित होते.