परस्पर विरोधी तक्रारीवरून दहा जणांविराेधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:20 IST2021-03-08T04:20:18+5:302021-03-08T04:20:18+5:30
कोळवाडी येथील फिर्यादी महिला बालिका लिंबाजी तांदळे या किनगाव येथे काही कामानिमित्त आले हाेते. दरम्यान, जयराम दहिफळे, व्यंकट दहिफळे, ...

परस्पर विरोधी तक्रारीवरून दहा जणांविराेधात गुन्हा दाखल
कोळवाडी येथील फिर्यादी महिला बालिका लिंबाजी तांदळे या किनगाव येथे काही कामानिमित्त आले हाेते. दरम्यान, जयराम दहिफळे, व्यंकट दहिफळे, रा.कोळवाडी आणि ज्ञानोबा घुले, माधव फड रा.हिंगणगाव यांनी संगनमत करून फिर्यादीसह पतीला शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी त्यांच्याजवळ असलेली सात हजारांची राेकड जबरदस्तीने काढून घेतली. फिर्यादीच्या नवऱ्याच्या अंगावर मोटरसायकल घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी किनगाव पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत फिर्यादी जयराम दहिफळे रा.कोळवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लिंबाजी तांदळे, बाळूबाई तांदळे, लक्ष्मण दहिफळे, संभा दहिफळे, वाघ्या दहिफळे, विठ्ठल दहिफळे सर्व रा.कोळवाडी यांनी संगनमत करून किनगाव येथे फिर्यादी मोटारसायकल घेऊन जात असताना, संगनमत करून मोटारसायकल अडवली. तू आमच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार का दिलीस, असे म्हणून मारहाण केली. मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण केली, तर फिर्यादीच्या खिशातील १० हजार जबरदस्तीने काढून घेतले. त्याचबराेबर, जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.