चापोली, प्रकाशनगरातून दुचाकीची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:20 IST2021-05-06T04:20:59+5:302021-05-06T04:20:59+5:30
दुकानाचे शटर तोडून चोरी लातूर : अहमदपूर येथे श्री स्वामी समर्थ जनरल व झेरॉक्सच्या दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी आत ...

चापोली, प्रकाशनगरातून दुचाकीची चोरी
दुकानाचे शटर तोडून चोरी
लातूर : अहमदपूर येथे श्री स्वामी समर्थ जनरल व झेरॉक्सच्या दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करून दुकानाच्या गल्ल्यातील ४५ हजार रुपये चोरल्याची घटना ७ एप्रिल रोजी घडली. याबाबत ४ मे रोजी गिराम रविशंकर कृष्णाप्पा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील पोना साळवे करीत आहेत.
जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल
लातूर : चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजनसोंडा येथे फिर्यादीला संगनमत करून काठीने डोक्यात मारून जखमी केले तसेच शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या आईला ढकलून देऊन जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत सोपान जनार्दन शेवाळे (रा. उमरगा यल्लादेवी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेषेराव संभाजी कोरे व अन्य दोघांविरुद्ध चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ राख करीत आहेत.
मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण
लातूर : तू आम्हाला आठ महिन्यापूर्वी शिव्या का दिल्या होत्या म्हणून भांडणाची कुरापत काढून बोरसुरी येथे एकाला मारहाण झाल्याची घटना घडली. याबाबत अंकुश श्रीरंग हदाने (रा. बोरसुरी, ता. निलंगा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोपाळ मोहन जाधव व अन्य दोघांविरुद्ध औराद शहाजानी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ गौंडगावे करीत आहेत.
मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण
लातूर : फिर्यादीच्या आईसोबत मागील भांडणाची कुरापत काढून एकाने मारहाण केल्याची घटना हासोरी शिवारात घडली. याबाबत पवन दत्तात्रय ढेगिंले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दत्तात्रय विठ्ठल ढेंगिले यांच्याविरुद्ध कासारशिरसी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ घोरपडे करीत आहेत.
लाथाबुक्क्यांनी मारहाण, गुन्हा दाखल
लातूर : फिर्यादीचा पुतण्या व आरोपी आपसात भांडण करीत असताना फिर्यादी भांडण सोडविण्यास गेले असता शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या पुतण्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना रामगिरीनगर येथे घडली. याबाबत लहू पुंडलिक वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परमेश्वर सुधाकर दंडे याच्याविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.