वीजमीटरमध्ये फेरफार; फाैजदारी गुन्हा अन् २५ लाख रुपयांचा दंड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:26 IST2021-09-16T04:26:09+5:302021-09-16T04:26:09+5:30

महावितरणच्या लातूर परिमंडळामध्ये लातूर, उदगीर, निलंगा, उस्मानाबाद, तुळजापूर आणि बीड, अंबाजाेगाई या उपविभागात वीजचाेरीविराेधात महावितरणच्या विशेष पथकांनी धडक कारवाई ...

Changes in electricity meters; Criminal offense and fine of Rs 25 lakh! | वीजमीटरमध्ये फेरफार; फाैजदारी गुन्हा अन् २५ लाख रुपयांचा दंड !

वीजमीटरमध्ये फेरफार; फाैजदारी गुन्हा अन् २५ लाख रुपयांचा दंड !

महावितरणच्या लातूर परिमंडळामध्ये लातूर, उदगीर, निलंगा, उस्मानाबाद, तुळजापूर आणि बीड, अंबाजाेगाई या उपविभागात वीजचाेरीविराेधात महावितरणच्या विशेष पथकांनी धडक कारवाई केली आहे. अनेकांनी वीजमीटरमध्ये हेराफेरी करत माेठ्या प्रमाणावर वीजचाेरी केली आहे. तर काही गावांमध्ये रात्रीच्या वेळी थेट विद्युत तारेवर आकडे टाकून वीजचाेरी करण्यात आली आहे. या पथकाने लातूर विभागात ऑगस्टअखेर २९६ जणांवर दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून २१ लाख ९ हजार ९९४ रुपयांचा दंड वसूल केला. तर ९८ जणांविराेधात त्या-त्या पाेलीस ठाण्यात फाैजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याकडून ४ लाख २ हजार ५४६ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

वीजचाेरीसाठी अशीही चालाखी...

१ अलीकडे वीजमीटरमध्ये माेठ्या प्रमाणावर फेरफार करण्याचे प्रकार वाढले आहेत. यासाठी खास टाेळ्याही कार्यरत आहेत. दाेन ते तीन हजार रुपयांत ही हेराफेरी करून दिली जात असल्याची ग्रामीण भागात चर्चा आहे. यातून वीजचाेरी माेठ्या प्रमाणावर केली जात आहे.

२ पूर्वी जुन्या पद्धतीचे वीजमीटर हाेते. यामध्ये फेरफार केले जात असल्याने आता इलेक्ट्रिक मीटर बसविण्यात आले आहेत. मात्र, यामध्येही हेराफेरी केली जात असल्याचे छापासत्रामध्ये समाेर आले आहे. वर्षाला लाखाे रुपयांची वीजचाेरी केली जात असल्याची सूत्रांनी सांगितले.

फाैजदारी गुन्हा अन् जबरी दंड...

महावितरणच्या लातूर परिमंडळामध्ये सात उपविभागात वीजचाेरीविराेधात माेहीम राबविली जाते. ही माेहीम वर्षभर राबविली जाते. या माध्यमातून लाखाे रुपयांची वीजचाेरी उघड करण्यात आली आहे. याप्रकरणी वीजचाेरांविराेधात फाैजदारी गुन्हे दाखल केली आहेत. त्यांच्याकडून लाखाे रुपयांचा दंडही वसूल केला आहे.

वीजचाेरांना दणका...

लातूर परिमंडळात वीजचाेरी करणाऱ्यांविराेधात धडक माेहीम हाती घेण्यात आली आहे. त्यांच्याविराेधात दंडासह गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया राबविली जाते. यासाठी ग्राहकांनी वीजचाेरी करू नये, शिवाय, मीटरमध्ये कुठलीही छेडछाेड करू नये. काही तक्रार असेल तर कर्मचाऱ्यांशी संपर्क साधवा. - सुंदर लटपटे, मुख्य अभियंता, लातूर

Web Title: Changes in electricity meters; Criminal offense and fine of Rs 25 lakh!