वीरशैव समाज अध्यक्षपदी चंद्रकांत वैजापुरे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:19 IST2021-02-10T04:19:26+5:302021-02-10T04:19:26+5:30
उदगीर येथे उर्वरित १६ जागांसाठी रविवार, ७ फेब्रुवारी राेजी येथील वीरशैव समाजासाठी संग्राम स्मारक विद्यालयात निवडणूक घेण्यात आली. यावेळी ...

वीरशैव समाज अध्यक्षपदी चंद्रकांत वैजापुरे बिनविरोध
उदगीर येथे उर्वरित १६ जागांसाठी रविवार, ७ फेब्रुवारी राेजी येथील वीरशैव समाजासाठी संग्राम स्मारक विद्यालयात निवडणूक घेण्यात आली. यावेळी ६७६ मतदारांपैकी ५४२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये उपाध्यक्षपदी प्रमोद शेटकार, सचिवपदी ॲड. श्रीकांत बडीहवेली, संगम महाजन हे विजयी झाले. तर कार्यकारिणी सदस्य म्हणून बाबूराव समगे, ॲड. एस.टी. पाटील, रवींद्र हसरगुंडे, साईनाथ चिमेगावे, रेखा कानमंदे, उत्तरा कलबुर्गे, शिवराज पाटील, राजकुमार हुडगे, अनिल बागबंदे, सत्यप्रकाश डांगे, शिवकुमार उप्परबावडे, गुरुप्रसाद पांढरे, सुशीलकुमार पटवारी आदी विजयी झाले आहेत. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. राजकुमार हसनाबादे यांनी काम पाहिले. त्यांना बालाजी चिंचोले, एस. टी. मुंढे, जे. एस. चोले, अनंत पारसेवार, अजय सोनकांबळे यांनी सहकार्य केले. निकालानंतर विजयी उमेदवारांचा वीरशैव समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.