लातूरमध्ये विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्काजाम
By हरी मोकाशे | Updated: June 19, 2024 19:22 IST2024-06-19T19:22:19+5:302024-06-19T19:22:19+5:30
पीककर्जाच्या व्याजाचा परतावा मिळावा

लातूरमध्ये विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्काजाम
देवणी : पीककर्जाच्या व्याजाचा परतावा तात्काळ देण्यात यावा, यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने येथील उदगीर- निलंगा राज्यमार्गावर बुधवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या.
शेतकरी संघटना मराठवाडा अध्यक्ष आनंद जीवने यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी हे आंदोलन झाले. शेतकऱ्यांना पीकविम्याचे वाटप करावे. अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे. दिवसा सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात सुरेंद्र अंबुलगे, मिथुन दिवे, गजानन उजळंबे, विकास नमनगे, मेळकुंदे मामा, भंडे, दत्ता अर्जुने, अरविंद भातांब्रे, अमर मुर्के, अजित बेळकोणे, सोमनाथ लुल्ले, देविदास पतंगे, शरण लुल्ले, अरुण पाटील, औदुंबर पांचाळ, माधवराव बिरादार, श्रीमंत लुल्ले, योगेश तगरखेडे, चेतन मिटकरी, मल्लिकार्जून ईश्वरशेट्टे, इब्राहिम तांबोळी, करीमभाई शेख, जावेद तांबोळी, चंद्रकांत माने पाटील, पांडुरंग कदम, कल्याण धनुरे, प्रताप कोयले, लक्ष्मण रणदिवे, गिरधर गायकवाड, साबणे, सिद्राम डोंगरे, बालाजी पाटील, कालिदास बंडे, किशोर पाटील विळेगावकर, संजय अंबुलगे, अजमभाई उंटवाले आदी सहभागी झाले होते. या आंदोलनास विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला. यावेळी पोलिस निरीक्षक माणिकराव डोके व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.