देवणीत केंद्र सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:24 IST2021-06-09T04:24:52+5:302021-06-09T04:24:52+5:30
देवणी : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरात केलेल्या दरवाढीविरोधात देवणी येथे तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने येथील पेट्रोल पंपासमोर ...

देवणीत केंद्र सरकारचा निषेध
देवणी : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरात केलेल्या दरवाढीविरोधात देवणी येथे तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने येथील पेट्रोल पंपासमोर सोमवारी आंदोलन करण्यात आले. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देऊन इंधन दर त्वरित कमी करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. अजित बेळकोने, ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन मानकरी, माजी जिल्हा परिषद सदस्य व गटनेते दिलीप पाटील-नागराळकर, जिल्हा उपाध्यक्ष मालबा घोणसे, निलंगा विधानसभा अध्यक्ष गजानन भोपणीकर, संगायोचे अध्यक्ष वैजिनाथ लुल्ले, पंचायत समितीचे माजी सभापती संजय रेड्डी, धनराज चिद्रे, पुंडलिक बिरादार, सोनू डगवाले, बालाजी बोबडे, राम भंडारे, बालाजी वळसांगवीकर, कृष्णा पाटील, प्रताप कोयले, माजी सरपंच देविदास पतंगे, अनिल पाटील, रशीद मल्लेवाले, सुभाष पाटील, नीळकंठ भोसले, राहुल बालुरे, यशवंत सोनकांबळे, अमित सूर्यवंशी, जावेद तांबोळी, आकाश बिरादार, सत्यवान वाघमारे, नामदेव मुराळे, शिवाजी राठोड, शिवा कांबळे, अकबर सय्यद, करीम शेख, निवृत्ती सूर्यवंशी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.