जिल्हाभरात बैलपोळा उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:25 IST2021-09-07T04:25:34+5:302021-09-07T04:25:34+5:30
लातूर शहरासह जिल्ह्यात वाढवणा बु., किनी यल्लादेवी, एकुर्गा राेड, हाळी-हंडरगुळी, सुकणी, साेनवळा, बेळसांगवी, लाळी, मंगरुळ, गुडसूर, डाेंगरशेळकी, घाेणसी, अतनूर, ...

जिल्हाभरात बैलपोळा उत्साहात साजरा
लातूर शहरासह जिल्ह्यात वाढवणा बु., किनी यल्लादेवी, एकुर्गा राेड, हाळी-हंडरगुळी, सुकणी, साेनवळा, बेळसांगवी, लाळी, मंगरुळ, गुडसूर, डाेंगरशेळकी, घाेणसी, अतनूर, गव्हाण, पाटाेदा, जळकाेट, जगळपूर, रावणकाेळा, धामणगाव, अहमदपूर शिरुर ताजबंद, किनगाव, अंधाेरी, चाकूर, चापाेली, वडवळ, जानवळ, आष्टा, नळेगाव, घरणी, उजळंब, राेहिणा, शेळगाव, डाेंग्रज, उदगीर, हेर, नळगीर, देवर्जन, करडखेल, शंभू उमरगा, देवणी, तळेगाव, देवणी खु. ताेगरी, वलांडी, धनेगाव, निलंगा, औराद शहाजानी, हलगरा, सावरी, कासार शिरसी, कासार बालकुंदा, अंबुलगा, मदनसुरी, किल्लारी, साकाेळ, जळवगा, निटूर, उजेड, खराेसा, लामजना, भादा, मुरुड, रेणापूर, औसा, शिरुर अनंतपाळ, यराेळ आदी गावांमध्ये बैलपाेळा साजरा करण्यात आला. आपल्या पशुधनाची, बैलांची सजावट करून दुपारनंतर गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर शेतकऱ्यांनी सपत्नीक बैलांची पूजा करून, त्यांना पुरणपाेळीचा नैवेद्य दिला. यावेळी गावागावांत पाेलिसांचा बंदाेबस्त तैनात करण्यात आला हाेता.