उदगीरात छत्रपती संभाजी राजे यांची जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:18 IST2021-05-15T04:18:07+5:302021-05-15T04:18:07+5:30
उदगीर : छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती बसस्थानकाशेजारील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी सकाळी उत्साहात साजरी करण्यात आली. पाणीपुरवठा ...

उदगीरात छत्रपती संभाजी राजे यांची जयंती साजरी
उदगीर : छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती बसस्थानकाशेजारील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी सकाळी उत्साहात साजरी करण्यात आली.
पाणीपुरवठा व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, पंचायत समितीचे सभापती शिवाजीराव मुळे, पालिकेचे उपाध्यक्ष सुधीर भोसले, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कल्याण पाटील, शिवसेनेचे चंद्रकांत टेंगेटोल, श्रीमंत सोनाळे, पालिकेचे पाणीपुरवठा सभापती मनोज पुदाले, नगरसेवक विक्रांत भोसले, ॲड. दत्ताजी पाटील, गणेश गायकवाड, सावन पस्तापुरे, संदीप पाटील, उदयसिंह मुंडकर, अहमद सरवर, प्रा. मदन पाटील, धनाजी मुळे, विपीन पाटील, राजकुमार अतनुरे, दत्ता पाटील-शेल्हाळकर, अमोल घुमाडे, संदीप मोहिते, राहुल अतनुरे, गोपाल पाटील, गोपाल गंदगे, सतीश पाटील-मानकीकर, आदी उपस्थित होते.