आर्ट ऑफ लिव्हिंग शाखा उदगीर व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवस कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून येथील अस्थिरोगतज्ज्ञ व प्राणायाम शिक्षक डॉ. आनंद आष्टुरे यांची उपस्थिती होती. यावेळी डाॅ. आष्टुरे यांनी योग, प्राणायाम व ध्यानाचे महत्त्व पटवून देत सुदृढ शरीरासाठी योग महत्त्वाचा असल्याचे सांगितले. श्वसनासाठी केला जाणारा योग म्हणजे प्राणायाम. श्वास हा प्रत्येक मानवी शरीरासाठी महत्त्वाचा घटक आहे. श्वासामुळे शरीराला ऊर्जा मिळते असेही ते म्हणाले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन क्रीडा संचालक प्रा. निहाल खान यांनी केले. आभार स्टाफ सेक्रेटरी डॉ. व्ही. के. भालेराव यांनी मानले. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. जगताप, डॉ. आर. एम. मांजरे यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.
शिवाजी महाविद्यालयात योग दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:14 IST