शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा करणे आले अंगलट, चार ताब्यात, दोघे पसार

By राजकुमार जोंधळे | Updated: September 5, 2022 10:25 IST

वाढदिवसानिमित्त त्याच्या मित्रांनी सार्वजनिक ठिकाणी रात्री कोयत्याने केक कापून फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले.

लातूर : मित्राच्या वाढदिवसाचा केक चक्क कोयत्याने कापून त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणे सहा मित्रांच्या चांगलेच अंगलट आले आहे. पोलिसांनी चार जणांच्या मुसक्या आवळल्या असून, अन्य दोघांनी गुंगारा देत धूम ठोकली आहे. ही घटना लातुरातील इस्लामपुरा परिसरात घडल्याचे समोर आले. याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात सोमवारी पहाटेच्या सुमारास सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी सांगितले, लातुरातील सम्राट चौक परिसरात राहणारा ऋतिक सुरेश हलगुंडे (वय १८) याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या मित्रांनी सार्वजनिक ठिकाणी रात्री कोयत्याने केक कापून फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. दरम्यान, हा प्रकार सायबर सेल आणि पोलिसांच्या निदर्शनास आला. याबाबत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनीही लागलीच शोधमोहीम हाती घेतली. याबाबत खबऱ्याने टीप दिल्यानंतर वाजिद चाँद सय्यद (वय २०, रा. इस्लामपुरा लातूर), संविधान ब्रह्मदेव धावरे (वय १८ रा. राहुल नगर, लातूर), सम्यक शाहूराज कांबळे (वय १९ रा. इस्लामपुरा लातूर) यांच्या मुसक्या आवळल्या. तर अन्य दोघे अमन मुजाहिद दख्खने (रा. इस्लामपुरा लातूर) आणि गोपाळ मदने ( रा. श्रीकृष्ण नगर, लातूर) हे पोलिसांना गुंगारा देत निसटले. त्यांच्या मागावर पोलीस पथक आहे. याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात सोमवारी पहाटे एकूण सहा जणांविरोधात भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी दिली. 

ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंड जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे, बालाजी गोणारकर, ज्ञानोबा देवकते, सहाय्यक फौजदार ढगे, अंमलदार विलास फुलारी, महेश पारडे, खंडू कलकते, राम सोनहिवरे, नारायण शिंदे, अशोक नलावड यांच्या पथकाने केली.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी