राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलच्या वतीने आरोग्य दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:20 IST2021-04-09T04:20:14+5:302021-04-09T04:20:14+5:30
सहावी प्रवेशपूर्व निवड चाचणी परीक्षा पुढे ढकलली लातूर : जवाहर नवोदय विद्यालयाच्या वतीने घेण्यात येणारी सहावी प्रवेशासाठी प्रवेश पूर्व ...

राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलच्या वतीने आरोग्य दिन साजरा
सहावी प्रवेशपूर्व निवड चाचणी परीक्षा पुढे ढकलली
लातूर : जवाहर नवोदय विद्यालयाच्या वतीने घेण्यात येणारी सहावी प्रवेशासाठी प्रवेश पूर्व निवड चाचणी परीक्षा १०
एप्रिल रोजी घेण्यात येणार होती. परंतु, नवोदय विद्यालय समिती मुख्यालयाच्या आदेशानुसार सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, आता ही परीक्षा १६ मे २०२१ रोजी आहे, अशी माहिती जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य जी. रमेश राव यांनी दिली.
किरकोळ कारणावरून मारहाण ; गुन्हा दाखल
लातूर : हाळी शिवारात नाल्यावर मुरुम टाकलेले पैसे दे म्हटल्याच्या कारणावरून फिर्यादी व फिर्यादीच्या पत्नीस अश्लील शिवीगाळ करून मारहाण झाल्याची घटना घडली. याबाबत ज्ञानेश्वर शिवराज आयनुले (रा. नागदरवाडी, ता. चाकूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारोती राम आयनुले व अन्य दोघांविरुद्ध वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सपोफौ. येडके पुढील तपास करीत आहेत.
कुरापत काढून मारहाण ; चौघा जणांविरुद्ध गुन्हा
लातूर : कुरापत काढून मारहाण झाल्याची घटना गवळीनगर गरुड चौक येथे घडली. याबाबत महेबूब अमिनसाब शेख (रा. गवळीनगर, गरुड चौक, ह.मु. धनेगाव एकबालनगर हैदराबाद रोड नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरबाज एकबाल सय्यद व अन्य तिघांविरुद्ध (सर्व रा. बौद्धनगर, लातूर) विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ. मुरळे करीत आहेत.
रस्त्यात अडवून एकास मारहाण
लातूर : मदनसुरी येथे बारच्या समोरील रस्त्यावर अडवून फिर्यादी सुरेश मदन मुळे (रा. आनंदवाडी, ता. निलंगा) यांना शिवीगाळ करून मारहाण झाली. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन उद्धव माने (रा. मदनसुरी, ता. निलंगा) यांच्या विरुद्ध कासारशिरसी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.