...
वातावरणात बदल, सर्दी, तापीचे रुग्ण
उदगीर : दिवसा उन्हं आणि रात्री थंडी जाणवत आहे. वातावरणातील बदलामुळे सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे शासकीय रुग्णालयासह खाजगी दवाखान्यात उपचारासाठी रुग्णांची रीघ लागत आहे. वातावरण बदलाचा आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे बालक आणि ज्येष्ठ नागरिक हैराण झाल्याचे दिसून येत आहे.
...
चिंचा लगडल्याने शेतक-यांतून समाधान
किनगाव : किनगाव परिसरातील चिंचेची झाडे लगडली आहेत. त्यामुळे शेतक-यांतून समाधान व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी या भागात चिंचा लगडण्याचे प्रमाण कमी होते. या भागातील शेतकरी चिंचेची वाढ होण्याच्या कालावधीतच व्यापा-यांना त्याची विक्री करतात. यातून काही प्रमाणात शेतक-यांना आर्थिक फायदा होतो. व्यापारी चिंचेचा झाडा करुन उदगीर, लातूर येथील बाजारपेठेत विक्री करतात. परराज्यात चिंचेला मोठ्या प्रमाणात मागणी असते.