महात्मा बसवेश्वर यांची जयंती सर्व कार्यालयांत साजरी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:18 IST2021-03-21T04:18:55+5:302021-03-21T04:18:55+5:30
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबईच्या वतीने ८ मे २०१३ रोजी महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्याबाबत ...

महात्मा बसवेश्वर यांची जयंती सर्व कार्यालयांत साजरी करा
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबईच्या वतीने ८ मे २०१३ रोजी महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्याबाबत आणि त्यांचे छायाचित्र कार्यालयात लावण्याबाबत परिपत्रक काढण्यात आले हाेते. काही शासकीय/निमशासकीय कार्यालयांत जयंती साजरी केली जात नाही. तर काही शासकीय/ निमशासकीय कार्यालयांत महात्मा बसवेश्वर यांचा फोटोही लावण्यात आलेला नाही.
यापूर्वी अनेक सेवाभावी संस्थांनी/मंडळांनी तसेच बसवप्रेमींनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. याबाबत जिल्हा/तालुका प्रशासनाने लक्ष घालून शासनाच्या परिपत्रकाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी हाेत आहे. १४ मे २०२१ रोजी महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी हाेत आहे. परिणामी, प्रत्येक कार्यालयात जयंती साजरी करावी, महात्मा बसवेश्वर यांचा फाेटा लावण्यात यावा, अशी मागणी समाजबांधवांतून हाेत आहे.