उदगीरातील गोरक्षण, तृतीय पंथीयांसह गरजूंना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:15 IST2021-07-18T04:15:37+5:302021-07-18T04:15:37+5:30

उदगीर : येथील व्यापारी विद्याधर स्वामी कनाडे व पार्वतीबाई स्वामी कनाडे यांच्यातर्फे गोरक्षण संस्था, तृतीयपंथी व समाजातील गरजूंना मदतीचा ...

Cattle protection in Udgira, helping the needy with third parties | उदगीरातील गोरक्षण, तृतीय पंथीयांसह गरजूंना मदत

उदगीरातील गोरक्षण, तृतीय पंथीयांसह गरजूंना मदत

उदगीर : येथील व्यापारी विद्याधर स्वामी कनाडे व पार्वतीबाई स्वामी कनाडे यांच्यातर्फे गोरक्षण संस्था, तृतीयपंथी व समाजातील गरजूंना मदतीचा हात देण्यात आला आहे.

तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रा. महादेव स्वामी कनाडे यांनी हा उपक्रम राबवला. गोरक्षण संस्थेला ११ हजार रुपये, तृतीय पंथीयांना ११ हजार रुपये, कोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने तालुक्यातील शिरोळ जानापूर येथील सोनाली विठ्ठल गोणे, चंद्रकला पंढरी मनदुमले व शकुंतला घाळप्पा कनाडे या कुटुंबांना प्रत्येकी ७ हजार ५०० रुपये तर वंचित घटकांना १,१०० रुपयांची मदत दिली. यावेळी संस्था सचिव, प्राचार्य प्रमोद चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे, पत्रकार विक्रम हलकीकर, रामभाऊ मोतीपवळे, सिद्धार्थ बोडके, गोरक्षण संस्थेचे प्रशांत मांगुळकर, दत्ता वाकुडे, नारायण वाकुडे, रामदास जळकोटे, उद्योजक कमलेश पेठे, अंजली पटेल आदी उपस्थित होते.

Web Title: Cattle protection in Udgira, helping the needy with third parties