वाहकाने चेकरला झोडपले, माेघा परिसराती घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:13 IST2021-03-29T04:13:42+5:302021-03-29T04:13:42+5:30
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी श्रीप्रभू बसवंतअप्पा सुलेकर हे कर्नाटक राज्य महामंडळात एस.टी. बस तपासणी पथकात कार्यरत आहेत. गत २० दिवसांपूर्वी ...

वाहकाने चेकरला झोडपले, माेघा परिसराती घटना
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी श्रीप्रभू बसवंतअप्पा सुलेकर हे कर्नाटक राज्य महामंडळात एस.टी. बस तपासणी पथकात कार्यरत आहेत. गत २० दिवसांपूर्वी बसची तपासणी केली असता, विनातिकिट प्रवासी वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी कारणे दाखवा नाेटीस देण्यात आली हाेती. याप्रकरणी वाहक गाेराख पाटील यास निलंबित करण्यात आले हाेते. याच घटनेचा राग मनात धरुन वाहक पाटील याने बस तपासणीसाठी आलेल्या कारच्या समाेर आपली माेटारसायकल अडवी लावली. दरम्यान, शिवीगाळ करुन मारहाण केली. शिवाय, शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी देवणी पाेलीस ठाण्यात श्रीप्रभू बसवंतअप्पा सुलेकर ५६ रा. गुलबर्गा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वाहक गाेरख गाेविंदराव पाटील रा. भंडार कुंमठा ता. औराद बराहळी जि. बीदर याच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक काथवटे करीत आहेत.