देवणी तालुक्यात २४ गावात आढळले काेराेनाचे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:18 IST2021-04-06T04:18:40+5:302021-04-06T04:18:40+5:30
देवणी शहरातील एका बँकेत काेराेनाचा रुग्ण आढळून आल्याने, गत तीन दिवसांपासून सदरची बँक बंद ठेवण्यात आली आहे. तालुक्यातील ...

देवणी तालुक्यात २४ गावात आढळले काेराेनाचे रुग्ण
देवणी शहरातील एका बँकेत काेराेनाचा रुग्ण आढळून आल्याने, गत तीन दिवसांपासून सदरची बँक बंद ठेवण्यात आली आहे.
तालुक्यातील वलांडी आणि बोळगाव येथील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर नागराळ येथे एकाच दिवशी १९ रुग्ण आढळून आल्याने चिंतेचे वातावरण आहे. देवणी शहरासह बोरोळ, नागराळ, अचवला, वलांडी, तळेगाव, दवण हिप्परगा, जवळगा, काेनाळी, कवठाळा, इंद्राळ, बटनपूर, टाकळी, भोपणी, अनंतवाडी, बोळेगाव, दरेवाडी, अंबानगर, हेळंब, अजनी, नेकनाळ, डोंगरेवाडी, गुरनाळ आधी २४ गावात सध्या कोराेना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. देवणी तालुक्यात दररोज नवीन गावाची आणि नव्या बाधित रुग्णांची भर पडत आहे. तर गत अनेक महिन्यांपासून येथील कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले होते; मात्र आता ते पुन्हा सुरू करण्यात आले आहे. सध्या येथे एक रुग्ण उपचार घेत आहे.
दुसऱ्यांदा आलेल्या रोगाचा प्रादुर्भाव पाहता तालुका प्रशासनाच्यावतीने तहसीलदार सुरेश घोळवे, नायब तहसीलदार इसामोद्दीन शेख, गटविकास अधिकारी मनोज राऊत, सहायक गटविकास अधिकारी अच्युत पाटील, पोलीस निरीक्षक सी.एस. कामठेवाड, पोलीस उपनिरीक्षक रंजीत काथवटे, पंकज शिंगारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप गुरमे, ग्रामीण रुग्णालयाचे शीतल एकघरे, डॉ. कालिदास बिरादार, बोरोळ केंद्राचे डॉ. पांडुरंग कलंबरकर, वलांडी केंद्राचे डॉ. चेतन हत्ते यांच्यासह आरोग्य प्रशासन, तालुका प्रशासनातील कर्मचारी काेराेनाचा प्रसार रोखण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
पाच केंद्रांवर १५०० नागरिकांना लस...
देवणी शहरासह बोरोळ, वलांडी, लासोना आणि दवण हिप्परगा येथील लसीकरण केंद्रावर आतापर्यंत जवळपास पंधराशे व्यक्तींना कोरोनो प्रतिबंधक लस देण्यात आली. शिवाय, सावरगाव आणि काेंनाळी केंद्रावरही लवकरच लसीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सध्या वरील सर्व केंद्रांवर लसीकरण देण्याची मोहीम आणि कोरोना चाचणीची सोय आरोग्य विभागाच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे.