२८ पोते गुटख्यासह कार जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:19 IST2021-04-16T04:19:11+5:302021-04-16T04:19:11+5:30
पोलिसांनी सांगितले, बुधवारी दुपारी साकोळ मार्गावरून कारचालक रामलिंग दयानंद चाकोते आणि रविशंकर संजय खानापुरे (दाेघेही रा. शिरुर अनंतपाळ) हे ...

२८ पोते गुटख्यासह कार जप्त
पोलिसांनी सांगितले, बुधवारी दुपारी साकोळ मार्गावरून कारचालक रामलिंग दयानंद चाकोते आणि रविशंकर संजय खानापुरे (दाेघेही रा. शिरुर अनंतपाळ) हे कार (एमएच ०३, एएम ३८५३) मधून राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तंबाखूची २८ पोती अवैध विक्रीसाठी घेऊन जात होते. त्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलीस निरीक्षक पी.बी. कदम यांनी पोहेकाॅ बब्रुवान तपघाले, पोना लतीफ सौदागर, गृहरक्षक दलाचे सलीम मुजावर यांच्या मदतीने तळेगाव (दे.) गावाजवळ सापळा रचून धाड टाकली. तेव्हा २ लाख ८५ हजार ८६५ रुपयाचा गुटखा जप्त केला.
गुरुवारी अन्न सुरक्षा अधिकारी विठ्ठल लोंढे यांनी येथील पोलीस ठाण्यात येऊन पंचनामा केला. त्यांच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोनि कदम हे करीत आहेत. दोघाही आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.