सामाईक बांधावरून मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा
औसा : तुम्ही आमच्या चुलत्याला सामाईक बांध का फोडला असे का विचारता म्हणून औसा तालुक्यातील सिंदाळा (लो.) येथे मारहाण झाल्याची घटना घडली. याबाबत ताजोद्दीन निजाम देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुलाब बाबुमियाँ देशमुख (रा. सिंदाळा लो., ता. औसा) व अन्य दोघांविरुद्ध औसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. शेख करीत आहेत.
पावसाचे पाणी शेतात; एकाला मारहाण
चाकूर : पावसाचे पाणी शेतात उलथण्याच्या कारणावरून मारहाण झाल्याची घटना नळेगाव शिवारात घडली. याबाबत दयानंद सदबा मानखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादीला कुऱ्हाडीने डोक्यात व साक्षीदाराला डोक्यात काठीने मारून जखमी केल्याचे म्हटले आहे. त्यानुसार प्रफुल्ल जीवन डोंगरे व अन्य आठ जणांविरुद्ध चाकूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अहमदपूर येथून दुचाकीची चोरी
अहमदपूर : अहमदपूर शहरातील गुटे नगर येथील घरासमोर एमएच २४ एएन २७२६ या क्रमांकाची दुचाकी पार्किंग केली होती. चोरट्यांनी सदर दुचाकी लंपास केली, असे प्रशांत गंगाधर दुवे यांनी अहमदपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद आहे.
अग्रोया नगर येथून दुचाकीची चोरी
लातूर : अग्रोया नगर येथील घरासमोर पार्किंग केलेल्या एमएच २४ व्हीएच ४३८७ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाली. याबाबत सतीश नारायण घोगरे (रा. अग्रोया नगर, लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.