शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

दुभाजकाला धडकून कार २०० फुट खड्ड्यात; कारचा चक्काचूर पण सीटबेल्टने तिघेही बचावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 16:36 IST

दुभाजकाला धडकून कार चौपदरी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला दोनशे फुटांवर खड्ड्यात

लातूर : नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर तुळजापूर मोड येथून लातूरकडे येताना वेगवान कार दुभाजकाला धडकून चौपदरी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला दोनशे फूट फरफटत, पलटी होत खड्ड्यात गेली. सोमवारी सायंकाळी ४:२० वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात कारच्या समोरचा भाग चक्काचूर झाला. मात्र, सीटबेल्ट लावल्याने कारमधील तिघे बचावले आहेत. एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत, तर दोघे किरकोळ जखमी आहेत.

तुळजापूर मोडहून औसा ते लातूरदरम्यान कार वेगाने निघाली होती. चालकाचा ताबा सुटल्याने कार दुभाजकावरून चौपदरी रस्त्यातील विरुद्ध बाजूचा रस्ता ओलांडून फरफटत खड्ड्यात गेली. यामध्ये कारमधील प्रसाद साळुंके यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांच्यावर औसा ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून लातूरला हलविल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. सी. थडकर यांनी सांगितले. इतर दोघे किरकोळ जखमी असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

जखमींची प्रकृती धोक्याबाहेर...गंभीर जखमी झालेले प्रसाद साळुंके यांच्या डोक्याला बाहेरून मोठी दुखापत आहे. परंतु, आतल्या बाजूने रक्तस्राव नाही. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे, असे न्यूरो सर्जन डॉ. हनुमंत किनीकर यांनी सांगितले. सीटबेल्ट लावल्यामुळे अपघातातील जखमींना मोठी दुखापत नसल्याचेही ते म्हणाले.

हेल्मेट, सीटबेल्ट असेल, तर गंभीर दुखापत टळतीलदुचाकीवरील अपघातात हेल्मेट असणारे वाहन चालक बचावतात. तर कारमध्ये सीटबेल्ट लावणारे प्रवासी सुरक्षित राहतात, असे अनेक अपघातांच्या प्रसंगामध्ये दिसून आले आहे. सोमवारचा अपघात भयंकर होता. कारच्या समोरच्या भागाचा चुरा झाला. दोनशे फूट पलटी खात कार खड्ड्यात कोसळली. केवळ सीटबेल्टमुळे गंभीर दुखापत टळली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरAccidentअपघात