लातुरात विदेशी दारूसह कार जप्त, विशेष पथकाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:15 IST2021-07-18T04:15:44+5:302021-07-18T04:15:44+5:30

पाेलिसांनी सांगितले, एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून क्रमांक एम.एच. २४ सी. ७७०८ देशी दारूची वाहतूक केली जात आहे, अशी ...

Car confiscated with foreign liquor in Latur, action of special squad | लातुरात विदेशी दारूसह कार जप्त, विशेष पथकाची कारवाई

लातुरात विदेशी दारूसह कार जप्त, विशेष पथकाची कारवाई

पाेलिसांनी सांगितले, एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून क्रमांक एम.एच. २४ सी. ७७०८ देशी दारूची वाहतूक केली जात आहे, अशी माहिती पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या विशेष पथकाला याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले. दरम्यान, लातुरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात सदरची कार सापळा लावून ताब्यात घेण्यात आली. यावेळी कारची तपासणी केली असता, कारमधून ४९ हजार ६२० रुपयाची देशी दारूची वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. दरम्यान, पाेलिसांनी विदेशी दारूसह कार असा एकूण २ लाख ४९ हजार ६२० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी विजय गाेविंद क्षीरसागर वय ३२ रा. तावरजा काॅलनी, काेल्हेनगर, लातूर याच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अंमलदार चंद्रकांत डांगे, लक्ष्मीकांत देशमुख, मोहन सुरवसे, रमेश चौधरी, गणेश खंदाडे, चालक पोलीस अंमलदार शेंडगे यांच्या विशेष पथकाने केली आहे. तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अशोक चौगुले करीत आहेत.

Web Title: Car confiscated with foreign liquor in Latur, action of special squad