बेडवरून उठताही येत नाही; लवकरच घरी येऊन दिली जाणार लस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:19 IST2021-07-26T04:19:23+5:302021-07-26T04:19:23+5:30
वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण ग्रामीण भागात सार्वजनिक आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांकडून अंथरुणावर असलेल्या रुग्णांचा डाटा संकलित केला जात आहे. तत्पूर्वी ...

बेडवरून उठताही येत नाही; लवकरच घरी येऊन दिली जाणार लस !
वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
ग्रामीण भागात सार्वजनिक आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांकडून अंथरुणावर असलेल्या रुग्णांचा डाटा संकलित केला जात आहे. तत्पूर्वी लस देण्याबाबत प्रशिक्षण या कर्मचाऱ्यांना देण्यात आले असून, दहापैकी पाच तालुक्यांचा डाटा संकलित झालेला आहे. उर्वरित तालुक्यांचा डाटा संकलित करणे सुरू आहे. शासनाच्या सूचना आल्यानंतर अशा व्यक्तींना घरी जाऊन लस देण्याचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे.
हायरिस्कमध्ये कोण?
जे रुग्ण आजारी आहेत, त्यांना चालता येत नाही. बेडवरच आहेत. अशी रुग्ण हायरिस्क समजून त्यांना घरी जाऊन लस दिली जाणार आहे. शहरात महापालिका, नगरपालिकांच्या आरोग्य विभागामार्फत अशा व्यक्तींचा डाटा संकलित केला जात आहे.
अंथरुणावर खिळून असलेल्या नागरिकांना लस देण्यासंदर्भात शासनाचे पत्र आले आहे. त्यानुसार माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीकर करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात आले आहे. शासनाकडून प्रोग्रॅम निश्चित झाल्यानंतर लागलीच घरी जाऊन लस दिली जाईल. - डॉ. गंगाधर परगे, जिल्हा आरोग्याधिकारी
पहिला डोस ५,३६,१३३
दुसरा डोस १,५३,४३४