शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

जि.प.उमेदवारांना मोबाईल अॅपवर दाखल करता येणार निवडणुकीचा खर्च!

By admin | Updated: January 13, 2017 20:02 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने True Voter हे अँड्राईड मोबाईलसाठी अ‍ॅप विकसित केले असून याचे वैशिष्ट्ये म्हणजे

ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 13 - जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने True Voter हे अँड्राईड मोबाईलसाठी अ‍ॅप विकसित केले असून याचे वैशिष्ट्ये म्हणजे या अ‍ॅपवरुन निवडणुकीला उभ्या असलेल्या उमेदवाराला आपला खर्च आॅनलाईन पध्दतीने दाखल करता येणार आहे. उमेदवाराबरोबच निवडणूक निर्णय अधिकारी, मतदार या दोघांनाही उपयुक्त असलेले हे अ‍ॅप मतदारांना आपल्या मतदान केंद्रापर्यंतचा रस्ताही दाखविणार आहे. निवडणुक आयोगाने मतदान प्रक्रियेत आॅनलाईन प्रणाली वाढविण्याच्या दृष्टीने हे टाकलेले मोठे पाऊल ठरण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी निवडणुकीचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरण्याची अट घालण्यात आली होती. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता. आता मोबाईलचा वापर मात्र पहिल्यांदाच होतो आहे. 
भारतातील निवडणुकांमधील कामे मोठ्या प्रमाणात ‘मॅन्युअल’ पध्दतीने करावी लागतात. परंतु आताा ‘कॅशलेश’ व्यवहार वाढविण्यासाठी आॅनलाईन साधनांचा वाढता वापर आता निवडणुकीच्या रणधुमाळीतही वाढतो आहे. राज्याच्या निवडणूक आयोगानेही निवडणुकीसाठी एक मोबाईल अ‍ॅप विकसित केले आहे. ‘True Voter’ हे त्या अ‍ॅपचे नाव. या अ‍ॅपमध्ये दहा ते पंधरा वेगवेगळे फोल्डर आहेत. प्रत्येक फोल्डर वेगळ्या कामांसाठी वापरता येते. विशेष म्हणजे हे अ‍ॅप उमेदवार, निवडणुक निर्णय अधिकारी आणि मतदार या तिघांनाही अत्यंत उपयुक्त आहे. उमेदवाराला यावर आपली शपथपत्रे जमा करता येतात. दैनंदिन खर्चाचेही आॅनलाईन रिपोर्र्टींग करता येते. निवडणुक निर्णय अधिकाºयांनाही हे अ‍ॅप वापरुन आपले कर्मचारी कुठे आहेत ? काय काम करताहेत ? याची खबर ठेवता येते.   त्यांनी केलेल्या कामाची नोंद थेट राज्य निवडणूक आयोगापर्यंत क्षणाधार्थ होते. वेगवेगळ्या स्तरावरील प्रशासकीय अधिकाºयांसाठी हे अ‍ॅप वापरताना वेगवेगळे पासवर्ड टाकून ते ज्यांच्याकडे ज्याची जबाबदारी तेवढेच पाहता येईल, याची व्यवस्था केली आहे. याशिवाय मतदार राजांना आपले  मतदान कोणत्या केंद्रावर आहे, याची घरबसल्या माहिती मिळते. आपल्या मतदान केंद्राचा पत्ता माहित नसल्यास हे गुगलशी जोडलेले अ‍ॅप मतदात्याला मतदान केंद्रावर जाण्यासही मदत करते.  
 
ही तर निवडणूकीची आॅनलाईन क्रांती : उपजिल्हाधिकारी गव्हाणे 
निवडणुक आयोगाचे हे अ‍ॅप म्हणजे निवडणुकीतील आॅनलाईन क्रांतीची सुरुवात आहे. जि. प. आणि पं. स. २निवडणुका ग्रामीण भागात आहेत. त्यामुळे या भागात  आॅनलाईन व्यवस्था किती पोहोचली याची चाचपणीही निवडणुक आयोगाला यामुळे करता येईल. सध्या निवडणुकीची बरीच कामे मॅन्युअलीच होतात. या अ‍ॅपमुळे निवडणुक प्रक्रियेतही आॅनलाईनने दस्तक दिली आहे. एखाद्या कर्मचाºयांने जर खर्च निवडणूक कार्यालयात जमा केला तर कागद गहाळ होऊ असतात. परंतु आॅनलाईन अ‍ॅपवर रिपोर्र्टींग केले तर  आरओला पाहता येईलच, शिवाय त्याची तत्काळ राज्य निवडणूक आयोगाकडेही रिपोर्र्टींग होईल, असे  सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.