गेल्या वर्षीपासून कोरोनाचे संकट आहे. गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर रुग्ण संख्या कमी झाल्यानंतर बाजारपेठ पूर्ववत होऊ लागली होती. आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तो रोखण्यासाठी प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात येत आहेत. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे शहरी भागातील अनेकांचा हातचा रोजगार गेला. त्यामुळे ही मंडळी शहराकडून गावाकडे येऊ लागली होती.
मागील काही महिन्यात कोरोना बाधितांच्या संख्येत घट होत असल्याने निर्बंध शिथील करण्यात येत होते. त्यामुळे व्यवसाय पूर्वपदावर येत होते. मात्र, मागील महिनाभरापासून पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने प्रशासनाने नियम अधिक कडक केले आहेत. आठवडी बाजार बंद करण्यात आले आहेत. तसेच हॉटेल, पानटपरी बंद ठेवण्याचे आदेश आहेत. विवाह सोहळ्यांना मर्यादा आली आहे. त्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्यांवर संकट आले आहे.