लातूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानक, नवीन रेणापूर नाका येथील बसस्थानकात पाॅपकाॅर्नसह खारेमुरे, फळे, गाेळ्या-बिस्किटांसह शीतपेयांचे स्टाॅल आहेत. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर गत मार्च २०२० पासून सर्वच व्यवहारावर परिणाम झाला. लालपरीची चाके जागेवरच थांबली हाेती. आता टप्प्या-टप्य्याने आता लालपरी लांबपल्ल्यासह जिल्ह्यातील अंतर्गत मार्गावर धावत आहेत. यातून बसस्थानकातील प्रवाशांची गर्दी वाढली आहे. यातून विविध स्टाॅलधारकांच्या व्यवसायाला गती मिळत आहे. यातून सध्या त्यांच्या राेजगाराचा प्रश्न निकाली निघाली आहे; मात्र अद्याप म्हणावा तसा व्यवसाय हाेताना दिसून येत नाही.
एस.टी. महामंडळाला द्यावे लागतात शुल्क...
बसस्थानकात उपहारगृह, फ्रूट स्टाॅल, पेपर स्टाॅल, लाॅटरी स्टाॅल, काॅफी स्टाॅल, केशकर्तनालय, खारेमुरे, गाेळ्या-बिस्किटांसह विविध प्रकारचे स्टाॅल आहेत. या स्टाॅलला महिन्याला हजाराे रुपयांचे भाडे आहे;मात्र काेराेना काळात अनेक महिने या स्टाॅलला टाळेच लागले हाेते. दरम्यान, आता लालपरी धावत असून, टप्प्या-टप्प्याने हे व्यवहारही पूर्वपदावर येत आहेत. सध्याला भाडे भरणेही कठीण झाले आहे. व्यवहार जेमतेम हाेत असल्याने स्टाॅलधारक त्रस्त झाले आहेत.