वलांडीत सराफा व्यापाऱ्याची आत्महत्या (प्रादेशिक)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:33 IST2021-02-06T04:33:47+5:302021-02-06T04:33:47+5:30

देवणी पोलिसांनी सांगितले की, वलांडी येथील बाजारपेठेत बालाजी धोंडिबा कलमे (वय ४२, रा. कोनाळी) यांचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. गुरुवारी ...

Bullion trader commits suicide in Valand (regional) | वलांडीत सराफा व्यापाऱ्याची आत्महत्या (प्रादेशिक)

वलांडीत सराफा व्यापाऱ्याची आत्महत्या (प्रादेशिक)

देवणी पोलिसांनी सांगितले की, वलांडी येथील बाजारपेठेत बालाजी धोंडिबा कलमे (वय ४२, रा. कोनाळी) यांचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. गुरुवारी त्यांनी पहाटे घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनानंतर कोनाळी या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी देवणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोउपनि. नारायण डप्पडवाड करीत आहेत. दरम्यान, येथील व्यापा-यांनी बाजारपेठ बंद ठेवून श्रध्दांजली वाहिली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.

मृताच्या खिशात चिठ्ठी...

मृत बालाजी कलमे यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून खिशात ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र चिठ्ठीत आपण कोणाचे देणे नाही, एवढेच लिहिले असल्याने मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

Web Title: Bullion trader commits suicide in Valand (regional)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.