लातुरातून होणार बुलेटचा फटाका गायब, पोलिसांनी घातला मुळावर घाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:25 IST2021-09-17T04:25:10+5:302021-09-17T04:25:10+5:30

लातूर शहरात मूळ वाहनांत बदल करून वापरणार्यांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे बुलेट वापरणारे बहुतांश वाहनधारक गाडीचे सायलेंसर, हॉर्न ...

The bullet fired from Latur disappeared, the police inflicted a wound on the root | लातुरातून होणार बुलेटचा फटाका गायब, पोलिसांनी घातला मुळावर घाव

लातुरातून होणार बुलेटचा फटाका गायब, पोलिसांनी घातला मुळावर घाव

लातूर शहरात मूळ वाहनांत बदल करून वापरणार्यांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे बुलेट वापरणारे बहुतांश वाहनधारक गाडीचे सायलेंसर, हॉर्न बदलून जाणीवपूर्वक गर्दीच्या ठिकाणी आवाजाचे फटाके फोडतात. यातून एखाद्याला हृदयविकाराचा झटका येऊन माणूस दगावूही शकतो. कानाचे पडदेही फाटू शकतात, तरीही काही मेकॅनिक, ऑटोमोबाईल्सवर असे हॉर्न, सायलेंसर बिनधास्तपणे विक्री केली जातात. हा धोका टाळण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनात वाहतूक शाखेने कारवाई मोहिम हाती घेतली आहे. त्यानुसार शहरातील पाच ऑटोमोबाईल्स व काका, दादा, मामा अशा नंबरप्लेट तयार करून देणार्या रेडियमवाल्यांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्या वाहनांबरोबरच आपल्यावरही मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली जाईल, असे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल बिर्ला, पोलीस उपनिरीक्षक आवेज काझी यांनी म्हटले आहे.

बुलेटधारकांचे डाटा संकलन...

लातुरातील सर्व बुलेटधारकांचे मोबाईल नंबर, ई मेल आयडी व इतर डाटाबेस आरटीओ कार्यालयाद्वारे प्राप्त करुन बुलेटधारकांना त्यांच्या मेलवर सायबर सेलकडून बल्क मेसेज, मेलद्वारे मोटार वाहन कायदा १९८८, कलम ५२ चे अनुपालन करणेबाबत नोटीसा पाठवण्याचा विचार आहे. नोटीसांचे उल्लंघन केल्यास त्यांचेवर कायदेशिर कार्यवाही होऊ शकते. नोटीसा तामील करुन पायबंद केले जाऊ शकते, अपवादात्मक प्रसंगी दंडाची वसुली करण्यासाठी वाहन ही जप्त करता येतील असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

विक्रेत्यांना नोटिस, उत्पादकांना काय...

बुलेटचे कर्णकर्कश आवाज येणारे सायलेंसर हॉर्न विक्री करणार्या विक्रेत्यांना वाहतूक शाखेकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ही कारवाई स्वागतार्ह असली तरी जी कंपनी याचे उत्पादन करते, त्यावर काय कारवाई होणार, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. पोलिसांनी मुळावर घाव घातल्याने आवाजाची धडकी कमी होणार आहे.

Web Title: The bullet fired from Latur disappeared, the police inflicted a wound on the root

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.