खरिपाच्या तोंडावर बैल बाजार बंद ; शेतकरी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:20 IST2021-05-09T04:20:14+5:302021-05-09T04:20:14+5:30

खरीप हंगाम महिनाभरावर आला असून हवामान खात्याने यंदा मान्सून हा जूनच्या १ तारखेला धडकणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे ...

Bull market closed in the face of kharif; Farmers harassed | खरिपाच्या तोंडावर बैल बाजार बंद ; शेतकरी हैराण

खरिपाच्या तोंडावर बैल बाजार बंद ; शेतकरी हैराण

खरीप हंगाम महिनाभरावर आला असून हवामान खात्याने यंदा मान्सून हा जूनच्या १ तारखेला धडकणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे चापोलीसह परिसरात शेतकऱ्यांनी शेती मशागतीच्या कामावर वेग दिला आहे. सद्यस्थितीत शिवारामध्ये ट्रॅक्टरद्वारे नांगरणीचे कामांना वेग आला आहे. वाढत्या महागाईमुळे शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करण्यावर भर देत असल्याचे दिसून येत आहे. यंदा डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरच्या ही मशागतीचे दर वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी बैलांच्या साहाय्याने मशागतीची कामे करण्यास प्राधान्य देत आहेत.

एप्रिल व मे महिन्यात बैल जोड्या खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैल बाजार बंद असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. मशागतीसाठी बैलांची आवश्यकता असल्याने काही शेतकरी वैयक्तिक स्तरावर बैलांचा शोध घेत आहेत. बैलांचे भावही वाढले आहेत.

एप्रिल- मे मध्ये खरेदी-विक्रीला वेग...

खरिपच्या पेरण्या साधारणतः जून, जुलैमध्ये केल्या जातात. त्यापूर्वी मशागतीची कामे पूर्ण करणे गरजेचे असते. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यात बैल जोड्यांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होते. यंदा कोरोनामुळे पशुधन बाजार बंद आहेत. बैलांची खरेदी-विक्री बंद असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्या फायदा घेत काही व्यापारी घेत आहेत. गतवर्षी ६० हजारात मिळणारी जोडी यंदा ७० ते ७५ हजार रुपयांत मिळत असल्याचे चित्र आहे.

व्यावसायिक अडचणीत...

बाजार बंद असल्याने बैल जोड्यांचे दर कमालीचे वाढले आहेत. तसेच चांगले व जातीवंत बैल मिळणे कठीण झाले आहे. खरिपाच्या तोंडावर बैलांच्या शोधात शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. तसेच पशुधनाच्या बाजारावर अवलंबून असणारे व्यावसायिक ही अडचणीत सापडले आहेत.

यंत्राद्वारे मशागतीचा अधिक दर...

चापोलीसह परिसरातील शेतकऱ्यांची पशुधन खरेदी- विक्रीसाठी हाळी हंडरंगुळी, नळेगाव, लोहा, जांब येथील आठवडे बाजारावर भिस्त असते. यंदा पशुधन बाजार बंद झाले आहेत. शेतीच्या मशागतीसाठी बैलजोडीची गरज आहे. त्यातच ट्रॅक्टरच्या मशागतीचे दर वाढले आहेत, असे येथील शेतकरी तुकाराम गोरगिळे यांनी सांगितले.

Web Title: Bull market closed in the face of kharif; Farmers harassed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.