कोविड केअर सेंटरसाठी इमारती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:18 IST2021-04-14T04:18:02+5:302021-04-14T04:18:02+5:30
लातूर : कोव्हिड-१९च्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील समाजकल्याण विभागाच्या अधिनस्त असलेल्या बऱ्याच इमारती कोविड केअर सेंटर स्थापन करण्यासाठी अधिगृहित ...

कोविड केअर सेंटरसाठी इमारती
लातूर : कोव्हिड-१९च्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील समाजकल्याण विभागाच्या अधिनस्त असलेल्या बऱ्याच इमारती कोविड केअर सेंटर स्थापन करण्यासाठी अधिगृहित करण्यात आल्या आहेत. या इमारतीमध्ये (वसतिगृह / निवासी शाळा ) येथील कार्यरत कर्मचारी, सेवक, सफाई कर्मचारी यांची सेवाही कोविड केअर सेंटरमध्ये वापरण्यात येते.
याबाबत स्पष्टीकरणास्तव आदेश निर्गमित करण्याची बाब जिल्हा प्राधिकरणाच्या विचाराधीन होती. म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष पृथ्वीराज बी. पी. यांनी जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाकडील इमारती (वसतिगृह / निवासीशाळा ) येथील बाह्यस्तोत कंपनीच्या स्वच्छता विषयक व सुरक्षाविषयक सेवांसह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अन्वये अधिगृहित केल्याचे समजण्यात यावे. यासाठी होणारा खर्च सामाजिक न्याय विभाग यांच्याकडून प्रचलित पद्धतीचा अवलंब करून करण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष पृथ्वीराज बी. पी. यांनी दिले आहे.