शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीच्या छळाने भावांचा राग अनावर; अद्दल घडविण्यासाठी केलेल्या मारहाणीत मेहुण्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 18:39 IST

लातुरातील घटनेट चारजणांविराेधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

लातूर : बार्शी मार्गावरील बारा नंबर पाटी येथे बहिणीला छळणाऱ्या मेहुण्याला अद्दल घडविण्याच्या उद्देशाने चाैघांनी काठी, लाकडाने जबर मारहाण केली. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या मेहुण्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, साेमवारी पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात दाेघा मेहुण्यांसह अन्य दाेघांविराेधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले की, गणेश चटनाळे, बसवराज चटनाळे यांच्या बहिणीचा विजयकुमार हणमंतप्पा पिल्ले (वय ३७) याच्याशी १५ वर्षांपूर्वी रीतीरिवाजाप्रमाणे विवाह झाला हाेता. दरम्यान, बहिणीला मेहुण्याने काही दिवस चांगले नांदविले. त्यांना दाेन अपत्य झाली. त्यानंतर क्षुल्लक-क्षुल्लक कारणावरून, छाेट्या-छाेट्या गाेष्टींवरून विजयकुमार हा पत्नीचा छळ करत हाेता. पत्नीने या छळाला कंटाळून एमआयडीसी पाेलीस ठाण्यात याबाबत तक्रारही दिली हाेती. पुन्हा विजयकुमार आणि पत्नीमध्ये रविवारी सकाळी कडाक्याचे भांडण झाले. याबाबतची तक्रार देण्यासाठी पत्नीने एमआयडीसी पाेलीस ठाणे गाठले. यावेळी तिने आपल्या भावाला याची माहिती दिली. अखेर बहिणीच्या छळाने त्रस्त झालेले भाऊ गणेश चटनाळे, बसवराज चटनाळे यांच्यासह अन्य दाेघांनी बारा नंबर पाटी गाठली.

मेहुणा विजयकुमार पिल्ले याला काठी, लाकडाने जबर मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मेहुण्याला लातुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान साेमवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात पाेलीस हवालदार प्रताप वांगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ओमकार संजय धाेत्रे (२०, रा. वसवाडी, लातूर) गणेश शरणाप्पा चटनाळे (२३), बसवराज चटनाळे (३२) आणि शहानवाज वजीर पठाण (२१, सर्व रा. विकासनगर, कळंब राेड, लातूर) यांच्याविराेधात गुरनं. १०० / २०२२ कलम ३०२, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पाेलीस निरीक्षक दीपाली गीते करीत आहेत.

रागाच्या भरात झाला खून...बहिणीचा सतत छळ हाेत असल्याने माहेरची मंडळी कमालीची त्रस्त झाली हाेती. मेहुण्याला याबाबत अनेकदा समज देण्यात आली हाेती. मात्र, व्यवसायाने चालक असलेल्या विजयकुमार पिल्ले आणि पत्नीमध्ये पुन्हा रविवारी भांडण झाले. याबाबतची माहिती पत्नीने भावाला दिली. रागाच्या भरात दाेघा भावांनी बारा नंबर पाटी गाठून मेहुणा विजयकुमार पिल्लेला काठी, लाकडाने जबर मारहाण केली. केवळ अद्दल घडवावी, या हेतूने ही मारहाण केल्याचे पाेलिसांनी सांगितले. मात्र, रागामध्ये केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या मेहुण्याचा मृत्यू झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूरDeathमृत्यू