दुकानाचे कुलूप तोडून दहा हजारांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:19 IST2021-04-04T04:19:49+5:302021-04-04T04:19:49+5:30
संगनमत करून मारहाण; गुन्हा दाखल लातूर : तुम्ही रंग खेळून आला आहात, होस्टेलसमोर लावलेली दुचाकी काढून घ्या असे म्हणाल्याचा ...

दुकानाचे कुलूप तोडून दहा हजारांची चोरी
संगनमत करून मारहाण; गुन्हा दाखल
लातूर : तुम्ही रंग खेळून आला आहात, होस्टेलसमोर लावलेली दुचाकी काढून घ्या असे म्हणाल्याचा राग येऊन चार जणांनी संगनमत करून शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सरकारी दवाखाना मेन गेटसमोर २ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी फिर्यादी केशव भगवान कांदे यांच्या तक्रारीवरून प्रतीक उर्फ सत्या प्रभाकर बेरखिले व सोबत असलेल्या तिघांविरुद्ध गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पठारे करीत आहेत.
कव्हा आराेग्य केंद्रात लसीकरणास प्रारंभ
लातूर : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बोरी अंतर्गत उपकेंद्र कव्हा येथे कोरोना लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला. यावेळी माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, डॉ. शिवप्रसाद बिरादार, आरोग्य सहायक डी.के. गिरी, ग्रामसेवक सूर्यवंशी, आरोग्य कर्मचारी नितीन स्वामी, एएनएम बुथीकर, इंगळे, शहाजी गायकवाड, गटप्रवर्तक बबली हत्ते, शिक्षक सुडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
ऑनलाइन व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबिर
लातूर : महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन व कोल्हापूर पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने ४ एप्रिल रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत ऑनलाइन व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात राज्य संघटनेचे अध्यक्ष विजय डांगरे, सचिव संजय नाईक, सहसचिव निलेश जगताप, मार्गदर्शक एम.पी. देसाई, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अजित पाटील आदी मार्गदर्शन करणार आहेत. या प्रशिक्षण शिबिराचा जिल्ह्यातील व्हॉलीबॉलप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा संघटनेचे सचिव दत्ता सोमवंशी यांनी केली आहे.
मनोजकुमार कामशेट्टी यांना पीएच.डी. प्रदान
लातूर : विद्याशाली फार्मसी व पॅरामेडिकल महाविद्यालयाचे संस्थापक तथा प्राचार्य मनोजकुमार विद्याधर कामशेट्टी यांना फार्मसी विषयातील पीएच.डी. प्राप्त झाली आहे. श्री सत्यसाई विद्यापीठ, भोपाळ येथील फार्मसी विभागातून त्यांनी आपले संशोधन डॉ. हेमंत शर्मा यांच्या मार्गदर्शनात पूर्ण केले. त्यांच्या या यशाबद्दल सहकारी, नातेवाईक व मित्र परिवाराच्या वतीने त्यांचे कौतुक होत आहे.