म्हैस चारण्याच्या कारणावरून मारहाण
लातूर: म्हैस चारण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याची घटना सोमनाथपूर येथे घडली. लाथाबुक्क्यांनी तसेच हातातील कत्तीने फिर्यादीला मारून जखमी केले. शिवाय, जीवे मारण्याची धमकी दिली, असे पृथ्वीराज कुणाल पवार यांनी उदगीर ग्रामीण पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार वैजनाथ चनबसप्पा चिमनचोडे (रा. मलकापूर, ता. उदगीर) याच्याविरुद्ध लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
घरासमोर पार्किंग केलेल्या दुचाकीची चोरी
लातूर : निलंगा तालुक्यातील अनसरवाडा येथे घरासमोर पार्किंग केलेल्या एम.एच. २४ झेड २८६१ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत सूर्यकांत माणिकराव गंगावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण
लातूर : मागील भांडणाची कुरापत काढून फिर्यादी व फिर्यादीच्या पत्नीला मारहाण केल्याची घटना गायत्री नगर येथे घडली. दगडाने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकीही दिली. याबाबत खाजा गणी शेख (रा. गायत्री नगर, लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कृष्णा सोनकांबळे व अन्य एकाविरुद्ध शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि. पवार करीत आहेत.
तू गल्लीत कसा राहतोस म्हणून धमकी
लातूर : मागील भांडणाची कुरापत काढून विनाकारण शिवीगाळ करून तसेच डोके भिंतीवर आपटून मारहाण केली. पोटात लाथाबुक्क्यांनी मारून तू गल्लीत कसा राहतोस म्हणून धमकी दिल्याची घटना गायत्री नगर येथे घडली. याबाबत समर्थ ऊर्फ अभिजीत श्रीकांत बनसोडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पप्पू शेख व अन्य दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि. पवार करीत आहेत.