नोव्हेंबरमध्ये मारुती महाराज कारखान्याचे बॉयलर प्रदीपन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:13 IST2021-06-30T04:13:50+5:302021-06-30T04:13:50+5:30
औसा तालुक्यातील बेलकुंड येथे मंगळवारी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याहस्ते कारखान्यातील मिल रोलरचे पूजन करण्यात आले. यावेळी ...

नोव्हेंबरमध्ये मारुती महाराज कारखान्याचे बॉयलर प्रदीपन
औसा तालुक्यातील बेलकुंड येथे मंगळवारी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याहस्ते कारखान्यातील मिल रोलरचे पूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी कारखान्याची सुरू असलेली डागडुजीची पाहणी केली. याप्रसंगी चेअरमन गणपत बाजुळगे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्रीपती काकडे, उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाठ, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, उपाध्यक्ष शाम भोसले, हरिराम कुलकर्णी, सचिन दाताळ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी, सरपंच विष्णू कोळी यांची उपस्थिती होती. माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले, कारखाना सुरू झाल्यानंतर येणारे दोन-तीन गळीत हंगाम विक्रमी झाले पाहिजे. तरच खऱ्याअर्थाने शेतकऱ्यांचे स्वप्न साकार होऊ शकेल. या परिसरात उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते, त्यामुळे शेतकऱ्यांना अडचण येऊ नये म्हणून या कारखान्याची निर्मिती झाली आहे. शासनाची थकहमी या कारखान्याला मिळावी, यासाठी प्रयत्न केले आहेत. जिल्हा बँकेनेही करखान्यावरील कर्जाचे पुनर्गठन केले असून, कर्जाच्या परतफेडीची मुदतदेखील वाढविली असून, कारखान्याच्या डागडुजीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. कारखाना सुरू करून त्या माध्यमातून इतर उपपदार्थ निर्मिती करून शेतकऱ्यांना अधिक भाव व कारखाना कर्जमुक्त करण्याचा आमचा मानस असल्याचेही ते म्हणाले.
मनुष्यबळाची कमतरता भासू देणार नाही
मारुती महाराज कारखान्याच्या मशिनरी दुरुस्तीचे काम सुरू असले, तरी उसाच्या नोंदीचे काम हाती घ्यावे लागणार आहे. ऊसउत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी या संस्था निर्माण केल्या असून, कारखान्याच्या कामकाजासाठी मनुष्यबळाची कमतरता जाणवू देणार नसल्याचेही माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले.
===Photopath===
290621\img-20210629-wa0015.jpg
===Caption===
पाथरवाला खुर्द येथे कृषि संजीवनी मोहिम निमित्त कृषी विभागाचे मार्गदर्शन