पाण्याच्या टाकीत आढळला तरुणाचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:14 IST2021-06-10T04:14:35+5:302021-06-10T04:14:35+5:30
लातूर : शहरातील पाच नंबर चाैकातील एका वाहन शाे-रुममधील पाण्याच्या प्लास्टिक टाकीत एका तरुणाचा मृतदेह आढळल्याची घटना बुधवारी सकाळी ...

पाण्याच्या टाकीत आढळला तरुणाचा मृतदेह
लातूर : शहरातील पाच नंबर चाैकातील एका वाहन शाे-रुममधील पाण्याच्या प्लास्टिक टाकीत एका तरुणाचा मृतदेह आढळल्याची घटना बुधवारी सकाळी समाेर आली. या तरुणाचा मृत्यू हा मंगळवारी झाल्याचे पाेलिसांनी सांगितले. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरातील सुशांत चंद्रकांत कांबळे (वय २९) हा तरुण बार्शी राेडवरील पाच नंबर चाैकात असलेल्या एका वाहनाच्या शाे-रुमध्ये ऑफिस बाॅय म्हणून काम करत हाेता. दरम्यान, त्याचा मृतदेह मंगळवारी रात्री उशिरा छतावरील पाण्याच्या प्लास्टिक टाकीत आढळला. याबाबत एमआयडीसी पाेलिसांशी संपर्क साधण्यात आला. बुधवारी सकाळी पाेलिसांनी घटनास्थळी भेट देत पाण्याची टाकी कटरने कापून मृतदेह बाहेर काढला. लातूरचे उपविभागीय पाेलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, पाेलीस निरीक्षक संजिवन मिरकले यांनी घटनास्थळाला भेट दिली. सुशांतचा मृत्यू नेमक्या काेणत्या कारणामुळे झाला, याचा शाेध एमआयडीसी पाेलीस घेत आहेत. याबाबत आकाश चंद्रकांत कांबळे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे बुधवारी एमआयडीसी पाेलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.
सीसीटीव्ही फुटेजची पाहणी
या तरुणाच्या मृत्यू प्रकरणाची चाैकशी करण्यासाठी एमआयडीसी पाेलिसांनी शाे-रुममधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. मयत सुशांत कांबळे हा मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास छतावर गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे, अशी माहिती पाेलीस निरीक्षक संजिवन यांनी दिली. मात्र, तपासाअंतीच सुशांतच्या मृत्यूचे कारण समाेर येणार आहे.