रेणापूर तालुक्यात चार ठिकाणी हाेणार महारक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:18 IST2021-03-15T04:18:32+5:302021-03-15T04:18:32+5:30
: कोरोनामुळे राज्यात दिवसेंदिवस रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. सध्याची गरज पाहून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी महारक्तदान ...

रेणापूर तालुक्यात चार ठिकाणी हाेणार महारक्तदान
: कोरोनामुळे राज्यात दिवसेंदिवस रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. सध्याची गरज पाहून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी महारक्तदान शिबिर घेण्याचा संकल्प केला आहे. रेणापूर तालुक्यात चार जिल्हा परिषद सर्कलनुसार शिबिराचे आयाेजन केले जाणार आहे. यामध्ये रेणापूर शहरातील रक्तदान शिबिर हे तालुक्यातील सर्वाधिक रक्तदान करणारे शिबिर अशी नोंद करावयाची आहे. यासाठी प्रत्येकाने कामाला लागावे, असे आवाहन रेणापूर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव यांनी केले आहे.
रेणापूर तालुक्यात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यासाठी श्री रेणुका देवी मंदिर सभागृहात रविवार बैठक झाली. यावेळी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष तुकाराम कोल्हे होते; तर विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद देशमुख, रेणाचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव, रेणाचे संचालक धनराज देशमुख, माजी सभापती रमेश सूर्यवंशी, नगरपंचायतीचे काँग्रेसचे गटनेते शिवाजी पाटील, संगायोचे अध्यक्ष गोविंद पाटील, ॲड. प्रशांत अकनगिरे, बाळाकृष्ण माने, डॉ. उमाकांत देशमुख, नगरसेवक अनिल पवार, सुंदरराव माने, युवक काँग्रेसचे महासचिव प्रमोद कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित नूतन सांगायो समितीतील पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीला रामहरी गोरे, सुनील चेवले, मतीन अली सय्यद, अनिल पवार, प्रकाश पाटील, रोहित गिरी, महादेव उबाळे, साजिद सय्यद, शिवाजी रणदिवे, दादाराव कांबळे, बलभीम मस्के, राज मस्के, चंद्रकांत जाधव, पाशूमियॉ शेख, नागनाथ दळवी, प्रेमनाथ मोटेगावकर, ओमकार माने, उमेश सोमानी, नितीन माने यांच्यासह पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्त्यांची माेठ्या प्रमाणावर उपस्थिती हाेती.