शिवशक्ती गणेश मंडळातर्फे रक्तदान शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:25 IST2021-09-17T04:25:14+5:302021-09-17T04:25:14+5:30
मिलिंद महाविद्यालयाचे जेईई परीक्षेत यश लातूर : नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत घेण्यात आलेल्या जेईई मेन्स परीक्षेत मिलिंद महाविद्यालयाने यश मिळविले ...

शिवशक्ती गणेश मंडळातर्फे रक्तदान शिबीर
मिलिंद महाविद्यालयाचे जेईई परीक्षेत यश
लातूर : नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत घेण्यात आलेल्या जेईई मेन्स परीक्षेत मिलिंद महाविद्यालयाने यश मिळविले असून, पाच विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यात लुद्रिक एलिझाबेथ सॅम, हर्षित व्यंकटेश पवार, ओम रामेश्वर सगर, वैष्णवी रविंद्र क्षीरसागर, हृदयनाथ भागवत पाटील यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थाध्यक्ष राहुल माने, प्राचार्य अंगदराव तांदळे, सचिन माने, प्रभारी प्राचार्य व्ही.आर. गायकवाड, प्रा.आर.डी. गोमारे, प्रा.बीपिन गायकवाड, प्रा.पी.एस. बोरुळे, प्रा.ए.पी. गंभिरे आदींनी केले.
कराटे स्पर्धेत ५१ पदकांची कामगिरी
लातूर : हिंगोली येथे युवा केंद्रामार्फत झालेल्या ओपन कराटे चॅम्पियनशीप स्पर्धेत लातूरच्या जी.के. स्पोर्टस् क्लबने घवघवीत यश संपादन केले. ५१ पदकांची कामगिरी केली. १३ सुवर्णपदक, १९ रौप्यपदक, १९ कांस्यपदक पटकाविले आहेत. यातील यशस्वी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी गणेश काकडे, गणेश मेकाले, शिवप्रसाद कुलकर्णी, मयुरी घोडके, रौनक वाघमारे, सुयश खद्दे, सोमनाथ सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.