महाशिवरात्रीनिमित्त रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:35 IST2021-03-13T04:35:44+5:302021-03-13T04:35:44+5:30
ज्ञानदीप महिला विकास मंडळातर्फे महिला दिन लातूर : शहरातील खोरी गल्ली येथील ज्ञानदीप महिला विकास मंडळाच्या वतीने जागतिक महिला ...

महाशिवरात्रीनिमित्त रक्तदान शिबिर
ज्ञानदीप महिला विकास मंडळातर्फे महिला दिन
लातूर : शहरातील खोरी गल्ली येथील ज्ञानदीप महिला विकास मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.यावेळी प्रा. शीतल ससाणे, महिला मंडळाच्या अध्यक्षा मंदाकिनी गोडबोले, दिग्विजय गोडबोले, अनुजा खुणे, शांताबाई कांबळे, ज्योती कांबळे, पुष्पा खुणे, जयवंता वाघमारे, कलावती गडेराव, वंदना गडेराव, पुष्पा दुधमांंडे, सुरेखा गोडबोले, निलांबरी कांबळे, बुद्धभूषण ढवळे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी प्रा. शीतल ससाणे आणि मंदाकिनी गोडबोले यांनी महिला सशक्तीकरण या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कक्कय्या समाज प्रतिष्ठानच्या वतीने जयंती साजरी
लातूर : लातूर जिल्हा कक्कय्या समाज प्रतिष्ठानच्या वतीने संत कक्कय्या महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जांबुवंतराव सोनकवडे, गणेश सावळकर, शंकरराव इंगळे, प्रभाकर कोकणे, दिगंबरराव खरटमल, विवेकानंद जांबुवंतराव सोनकवडे, कौशल्या सोनकवडे, संगीता सोनकवडे, विजयकुमार रसाळ आदींसह प्रतिष्ठानच्या सदस्यांची उपस्थिती होती.
भगवान गौरीशंकर मंदिरात महाभिषेक
लातूर : शहरातील मार्केट यार्ड येथील भगवान गौरीशंकर मंदिरात माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर व जि.प.च्या माजी अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांच्या हस्ते महाभिषेक करण्यात आला. यावेळी मंदिर व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष दिनकर पाटील, उपाध्यक्ष सोलापुरे, दिलीप पाटील, सहसचिव नंदकिशोर सोनी, सदस्य जुगलकिशोर पल्लोड, दिनकर पाटील, राजकुमार शेटे आदींची उपस्थिती होती.
आदर्श गाव योजनेसाठी संस्थांनी पुढाकार घ्यावा
लातूर : आदर्श गाव योजनेमध्ये पाणलोट विकासासह जल, जमीन, वन, कृषी मूलभूत सुविधा, रोजगार, शिक्षण, आरोग्य विकास, लोक विकास, समाज विकास आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. योजनेसाठी पाच गावे निवडण्याचे आवाहन कार्याध्यक्ष पोपटराव पवार तसेच जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.गाव समाविष्ट करण्यासाठी विविध सामाजिक संस्था यांनी पुढाकार घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.