चापोली येथे महारक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:18 IST2021-03-21T04:18:46+5:302021-03-21T04:18:46+5:30
शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी सभापती डॉ. नारायण चाटे यांच्या हस्ते करण्यात झाले. लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लातूर ...

चापोली येथे महारक्तदान शिबिर
शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी सभापती डॉ. नारायण चाटे यांच्या हस्ते करण्यात झाले. लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लातूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलअंतर्गत १६ ते २१ मार्च या कालावधीत ‘संकल्प २१०० महादाता महाअभियान’ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यानुसार चापोली येथे शुक्रवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी भेट दिली. शिबिराच्या यशस्वितेसाठी चाकूर तालुका काँग्रेस उपाध्यक्ष डॉ. भालचंद्र चाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. पुंडलिक चाटे, सिराज पाटील, प्रा. फुलचंद चाटे, सुभाष शंकरे, अलिमियां देशमुख, सरोवर शैख, बाबूराव तरगुडे, बाळू शिंदे, बळिराम मद्रेवार, आसद देशमुख, शैख युसूफ, सलीम तांबोळी, पप्पूभाई शेख, गंगाधर केराळे, युसूफ शेख, पंचशीला भोसले, बालाजी कांबळे, नीलेश देशमुख, अनिल शेळके, रिजवान देशमुख, दत्ता बैकरे, संतोष गडदे यांनी पुढाकार घेतला.