अहमदपुरात रक्तदान शिबिर, १५२ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:18 IST2021-03-22T04:18:12+5:302021-03-22T04:18:12+5:30
अहमदपूर : तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने पालकमंत्री अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे ...

अहमदपुरात रक्तदान शिबिर, १५२ जणांचे रक्तदान
अहमदपूर : तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने पालकमंत्री अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सांब महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष ॲड. हेमंत पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवानंद हेंगणे, चंद्रकांत मद्दे, शंकर गुट्टे, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सिराजोद्दीन जागीरदार, शिवाजीराव देशमुख, शहराध्यक्ष विकास महाजन, मुजम्मील सय्यद, कलीमोद्दीन अहमद, राजू पाटील, अशिष गुणाले, मारोती माने, अक्षय देशमुख उपस्थित होते. या शिबिरात १११ दात्यांनी रक्तदान केले. यावेळी राम नरवटे, राजू पाटील, प्रफुल्ल ढवळे, प्रकाश ससाणे, शिवाजी पाटील, दिलीप पाटील, बंडू येरमे, धनराज गिरी, विवेकानंद बोंडगे, संजय मिरजगावे, सदाम पटेल, फेरोज शेख, चंद्रशेखर भालेराव, शंकर बयास, वैजनाथ चौधरी उपस्थित होते.
यल्लादेवी उमरगा येथे आयोजित रक्तदान शिबिरात ४१ पिशवी रक्त संकलन करण्यात आले. यावेळी ऋषिकेश सोमवंशी, बळीराम सोमवंशी, खंडेराव शेवाळे, हंसराज सोमवंशी, विष्णुदास सोमवंशी, धोंडीराम पांचाळ, नारायण गजभारे, संदेश कांबळे उपस्थित होते.
फोटो कॅप्शन : पालकमंत्री अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटनाला सांब महाजन, ॲड. हेमंत पाटील, सिराजोद्दीन जागीरदार, विकास महाजन, मुज्जमील सय्यद उपस्थित होते.