निलंग्यात १४७ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:14 IST2021-05-03T04:14:56+5:302021-05-03T04:14:56+5:30
२१ वर्षांची परंपरा जपत हे रक्तदान शिबिर येथील नक्षत्र मंगल कार्यालयात घेण्यात आले. यावेळी सतीश पाखरसांगवे, विशाल चव्हाण, अमोल ...

निलंग्यात १४७ जणांचे रक्तदान
२१ वर्षांची परंपरा जपत हे रक्तदान शिबिर येथील नक्षत्र मंगल कार्यालयात घेण्यात आले. यावेळी सतीश पाखरसांगवे, विशाल चव्हाण, अमोल बाहेती, सुशील वजीर, कुलदीप पवार, सरस्वती शाहीर, अश्विनी जाधव, श्रद्धा शाहीर, वैष्णवी शाहीर यांनी रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले. याप्रसंगी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, उपनगराध्यक्ष मनोज कोळ्ळे, काँग्रेसचे अभय सोळुंके, डॉ. लालासाहेब देशमुख, ओबीसी नेते प्रा. दयानंद चोपणे, प्रा. गजेंद्र तरंगे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रा. डॉ. हंसराज भोसले, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रल्हाद बाहेती, निलंगा तालुका जिल्हा परिषद शिक्षकांच्या पतसंस्थेचे चेअरमन अरुण सोळुंके, विशाल जोळदापके, कृष्णा नाईक, शुभम पाटील झरीकर, गजानन पाटील, किशोर बिराजदार, पवन शिंदे, परमानंद जाधव, सुखानंद बिरादार यांनी शिबिरास भेट दिली.
यशस्वीतेसाठी स्वराज्य सेवाभावी संस्थेचे दत्ता शाहीर, डॉ. लालासाहेब देशमुख, आनंद जाधव, किशोर दुधनकर, स्वराज शाहीर, साई कांबळे, सचिन निटुरे, स्वरूप शाहीर, वीरेंद्र शाहीर, संजय खोत, किरण माने, ईश्वर पाटील, जनार्धन बिरादार, आकाश रासुरे, बब्रुवान जाधव, नामदेव खोत, अरुण जाधव, अविनाश नाईक, संदीप नाईक, अर्जुन नाईक, दुर्गा माकणे यांनी परिश्रम घेतले. रक्तसंकलन लातूरच्या भालचंद्र ब्लड बँकेचे डॉ. योगेश गवसाने, दिगंबर पवार, किशोर पवार, महेंद्र गांधले, संतोष पाटील, सुनील जहागीरदार, मुजीब सौदागर, पूजा शिंदे, सुरेखा हजारे, जयप्रकाश सूर्यवंशी, परहान शेख, अरुण कासले, बालाजी वेदपाठक, संजय ठाकूर, महेबुब मुल्ला, नितीन क्षीरसागर, अन्सार शेख यांनी केले.