जळकोटच्या शिबिरात १२१ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:18 IST2021-03-20T04:18:16+5:302021-03-20T04:18:16+5:30

जळकोट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारुती पांडे, नगरपंचायतीतील काँग्रेस गटनेते महेश शेटे यांच्या पुढाकाराने हे शिबिर पंचायत समिती सभागृहात ...

Blood donation of 121 people in Jalkot camp | जळकोटच्या शिबिरात १२१ जणांचे रक्तदान

जळकोटच्या शिबिरात १२१ जणांचे रक्तदान

जळकोट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारुती पांडे, नगरपंचायतीतील काँग्रेस गटनेते महेश शेटे यांच्या पुढाकाराने हे शिबिर पंचायत समिती सभागृहात शुक्रवारी घेण्यात आले. उद्घाटन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हा. चेअरमन पृथ्वीराज शिरसाट, सचिन दाताळ, सुरेश चव्हाण, बाजार समितीचे माजी सभापती मन्मथ किडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारुती पांडे, जिल्हा किसान सेलचे अध्यक्ष किरण पवार, जिल्हा परिषद सदस्या रुक्मिणीबाई जाधव, पंचायत समिती सभापती बालाजी ताकबिडे, युवक काँग्रेसचे तालुका सरचिटणीस संग्राम नामवाड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, नगरपंचायतीतील काँग्रेसचे गटनेते महेश शेटे, सरपंच सतीश चव्हाण, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष महेताब बेग, बाजार समितीचे माजी संचालक बाबूराव जाधव, हळद वाढवण्याचे सरपंच सत्यवान पाटील, रामेश्वर जाधव, दत्ता पवार, सिद्धार्थ सूर्यवंशी, संग्राम कांबळे, सतीश वाघमारे, गोपाळकृष्ण गबाळे, नितीन धुळशेटे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंदन पाटील, प्रदीप काळे, बालाजी बनसोडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन किरण पवार यांनी केले. आभार संग्राम नामवाड यांनी मानले.

Web Title: Blood donation of 121 people in Jalkot camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.