जळकोट येथील शिबिरात १२१ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:18 IST2021-03-21T04:18:35+5:302021-03-21T04:18:35+5:30
जळकोट तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुकाध्यक्ष मारुती पांडे, काँग्रेसचे नगरपंचायतचे गटनेते महेश शेटे यांच्या पुढाकारातून रक्तदान शिबिर घेण्यात आले. ...

जळकोट येथील शिबिरात १२१ जणांचे रक्तदान
जळकोट तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुकाध्यक्ष मारुती पांडे, काँग्रेसचे नगरपंचायतचे गटनेते महेश शेटे यांच्या पुढाकारातून रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन पृथ्वीराज शिरसाट तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिन दाताळ, जिल्हा समन्वयक सुरेश चव्हाण, बाजार समितीचे माजी सभापती मन्मथप्पा किडे, जिल्हा किसान सेलचे अध्यक्ष किरण पवार, जिल्हा परिषद सदस्य रुक्मिणीबाई जाधव, पंचायत समिती सभापती बालाजी ताकबिड, युवक काँग्रेसचे तालुका सरचिटणीस संग्राम नामवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, नगरपंचायतीचे काँग्रेसचे गटनेते महेश धूळशेटे, सरपंच सतीश चव्हाण, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष महता बेग, बाजार समितीचे माजी संचालक बाबूराव जाधव, हळद वाढण्याचे सरपंच सत्यवान पाटील, रामेश्वर जाधव, दत्ता पवार, सिद्धार्थ सूर्यवंशी, संग्राम कांबळे, सतीश वाघमारे, गोपाळकृष्ण गबाळे, नितीन धूळशेटे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंदन पाटील, प्रदीप काळे, बालाजी बनसोडे आदी उपस्थित होते.