भाजपातील मातब्बर राष्ट्रवादीत, चाकूर नगरपंचायतीची समिकरणे बदलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:32 IST2020-12-05T04:32:25+5:302020-12-05T04:32:25+5:30
माजी आमदार विनायकराव पाटील यांचे कट्टर समर्थक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राधाकिशन तेलंग यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. ...

भाजपातील मातब्बर राष्ट्रवादीत, चाकूर नगरपंचायतीची समिकरणे बदलणार
माजी आमदार विनायकराव पाटील यांचे कट्टर समर्थक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राधाकिशन तेलंग यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत माजी सभापती राधाकिशन तेलंग, जय जवान साखर कारखानाचे माजी संचालक बालाजी सूर्यवंशी, झरी (बु.) चे माजी सरपंच दयानंद सुरवसे, भाजपाचे शहर उपाध्यक्ष शिवदर्शन स्वामी, अमोल शेटे, युवराज पाटील झरीकर, राम सारोळे, अशोक सोनकांबळे आदीनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार विक्रम काळे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे आदी उपस्थित होते.
भाजपातील गटा-तटाच्या राजकारणामुळे जनतेच्या प्रश्नाला न्याय मिळत नाही. तालुक्यातील सर्वसामान्यांची भाजपाच्या कालावधीत म्हणावी तशी कामे झाली नाहीत. शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. तालुक्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची माहिती माजी सभापती राधाकिशन तेलंग यांनी दिली.
***