बसवकल्याण पोटनिवडणुकीत भाजपाचे सलगर विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:15 IST2021-05-03T04:15:03+5:302021-05-03T04:15:03+5:30
कर्नाटकातील बसवकल्याण विधानसभा मतदारसंघाचे आ. बी. नारायणराव यांचे निधन झाल्याने सदरील जागेसाठी पोटनिवडणूक झाली होती. त्यासाठी १७ एप्रिल रोजी ...

बसवकल्याण पोटनिवडणुकीत भाजपाचे सलगर विजयी
कर्नाटकातील बसवकल्याण विधानसभा मतदारसंघाचे आ. बी. नारायणराव यांचे निधन झाल्याने सदरील जागेसाठी पोटनिवडणूक झाली होती. त्यासाठी १७ एप्रिल रोजी मतदान झाले. रविवारी बीदर येथील भूमरेड्डी महाविद्यालयात मतमोजणी झाली. यात भाजपाचे शरणू सलगर यांनी प्रतिस्पर्धी माला बी. नारायणराव यांच्यापेक्षा २० हजार ९०४ मते अधिक घेऊन सलगर विजयी झाले.
शरणू सलगर यांना एकूण ७० हजार ५५६ मते मिळाली. कॉंग्रेसच्या माला बी. नारायणराव यांना ५० हजार १०८ मते मिळाली. जनता दलाचे उमेदवार सय्यद अलि खादरी यांना ११ हजार ३९०, तर माजी आ. मल्लिकार्जुन खुब्बा यांना ९ हजार ३९० मतांवर समाधान मानावे लागले.
या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले होते. कारण, कर्नाटकात भाजपाची सत्ता आहे. बीदर जिल्ह्यात सध्या काँग्रेसचे तीन, भाजपाचा एक, जनता दलाचा एक आमदार आहे. आता या निवडणुकीनंतर भाजप आमदाराची संख्या दोन झाली आहे. ही निवडणूक बीदरचे भाजपा खा. भगवंत खुब्बा यांनी प्रतिष्ठेची केली होती. तसेच कर्नाटक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष व भालकीचे आमदार ईश्वर खंड्रे यांच्याही प्रतिष्ठेची झाली होती. कारण, दोन्ही नेत्यांवर पक्षश्रेष्ठींनी आपले उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी सोपविली होती. खा. भगवंत खुब्बा यांनी त्यात बाजी मारली आहे.
हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी केलेल्या विकासकामांमुळे झाला आहे, असे खा. भगवंत खुब्बा म्हणाले.